रक्त दान हेच श्रेष्ठदान..एक हात मदतीचा, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पाचोरा तालुका यांचे महत्त्वपूर्ण कार्य…

0
51

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

हकेला साथ आणि गरजू रुग्णांना रक्तदानासाठी हात.. टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष पै.दिपक सिरसाठ यांचे व सदस्यांचे उल्लेखनीय कार्य पाचोरा तालुक्यात सुरू आहे.

टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष, मा.पै.जालींदर भाऊ जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ‌‌.पै.तानाजी भाऊ जाधव, खान्देश विभाग अध्यक्ष ,पै.ऋषिकेश बाबा भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष पै.दिपक भाऊ सिरसाठ यांचे व सदस्यांचे उल्लेखनीय कार्य सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रभर या कार्याचे कौतुक होत असून या टायगर ग्रुपच्या प्रेरणादायी सकल्पनेचा सर्वाना आदर्श घेण्यासारखा आहे.

महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात गावात टायगर ग्रुप नावलौकिक असून या टायगर ग्रुपकडे महाराष्ट्रातील राज्याबाहेरील युवकांना याची आवड असल्याचे समोर आले आहे.

टायगर ग्रुप पाचोरा तालुका यांच्या वतीने आता पर्यत 300 ते 400 गरजू रुग्णांना टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष पै.दिपक सिरसाठ..यांच्या सह सर्व टायगर ग्रुपच्या सदस्यांनी रक्तदान करून जीवदान दिले आहे विशेष म्हणजे रुग्ण हा कुठल्याही तालुक्यातील असला तरी माहिती मिळताच एका हाकेवर पै. दिपक भाऊ सिरसाठ व टायगर ग्रुप सदस्य मदतीला हजर असतात त्यांचा हा आदर्श शिकण्यासारखा आहे टायगर ग्रुपचे हे कार्य फक्त जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असून वेगवेगळ्या स्तरातून याची प्रशांसा केली जात आहे.. विशेष म्हणजे रक्तदान व्यतिरिक्त अनेक समाजोपयोगी उपक्रम टायगर ग्रुप पाचोरा तालुका यांच्या माध्यमातून होत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here