साईमत, चोपडा : प्रतिनिधी
माजी शिक्षण मंत्री शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या ५ डिसेंबर रोजी ४१ व्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारी, ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी शिक्षण मंडळ आवारातील श्रीमती अनुसयाबाई साळुंखे सभागृहात होणार आहे. रक्तदान शिबिर महात्मा गांधी शिक्षण मंडळ व रक्त केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १०० रक्तदाते रक्तदान करणार आहेत. महात्मा गांधी शिक्षण मंडळ, कस्तुरबा महिला समाज शिक्षण मंडळ, आदिवासी सेवा मंडळ अंतर्गत इच्छुक शिक्षकांनी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहसचिव डॉ.श्री डी. ए.सूर्यवंशी यांनी केले आहे.
