संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर

0
31

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात १०४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजसेवेत योगदान दिले. शिबिराचे उद्घटन हिराशेठ बजाज, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, संत निरंकारी मंडळाच्यावतीने महेश वाघ, सेक्टर संयोजक, पाचोरा, आ. विजय परदेशी, ब्रांच मुखी, बहाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

रक्तदान शिबिराची प्रचार रॅली चाळीसगाव शहरात राबविण्यात आली होती. चाळीसगाव ब्रांचमधील कॅशियर बाबाजी कवडे, अकाऊंटट जयसिंग पाटील, आसपासच्या पाड्यातून प्रबंधक, साधसंगत व सेवादल युनिट नं. ११८८ चे सेवादल संचालक सतिष भालेराव, सेवादल शिक्षक ईश्वर कुमावत, सेवादल महिला इंचार्ज मनिषा मराठे तसेच सेवादल महिला व पुरुषांनी सतत २ दिवस जनजागृती रॅली, शिबिराला योगदान दिले.

अनेकांनी निभावला मानवतेचा धर्म

रक्तदान करण्यासाठी बऱ्याच जणांच्या मनात भीती असते. परंतु यासाठी मंडळाच्या महिला सेवादलाच्या सदस्य सेवेसाठी पुढे आले. रक्ताचा कोणताही जात, धर्म नसतो. याप्रमाणे बरेच हिंदू, मुस्लिम, सिंधी बांधवांनी एकत्र येऊन रक्तदान करून मानवतेचा धर्म निभावला. रक्तदान शिबिरात रक्त संकलन करण्यासाठी धुळे सिव्हिल हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. समारोप्रसंगी आ.झुलेलालजी पंजाबी, ब्रांच मुखी, चाळीसगाव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here