बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

0
41

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे खु., पिंपळे बु. आणि आटाळे गावातील शाळकरी मुले ही दररोज शाळेत ये-जा करत असतात. अशावेळी अमळनेर आगारातील बसेस पिंपळे येथील विद्यार्थ्यांना घेऊन जात नसल्याचा गंभीर आरोप करत सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.५० वाजेच्या सुमारास तिन्ही गावातील शाळकरी मुला-मुलींनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जवखेडा ते अमळनेर रस्त्यावर दोघी बाजूला मोठ्या प्रमाणावर बसेस व इतर वाहनांच्या मोठी गर्दी झाली होती. आंदोलनात त्यांचे पालकही धावून आले होते.

अमळनेर शहरात शाळेत जाण्यासाठी बसेसमधून जातात. कारण मुलींना बसेसमधून मोफत प्रवास आहे. शाळकरी मुलांनी रास्ता रोको भर रस्त्यावर एक ते दीड तास केला. आंदोलनात मुलांनी अमळनेरकडे जाणाऱ्या तसेच जवखेडाकडे जाणाऱ्या सर्व बसेस अडवून घेतल्या होत्या. लहान मुले बसेस अडवून आंदोलन करत असल्याचे आंदोलनकर्त्या मुला-मुलींशी संवाद साधला. परिस्थितीचे गांभीर्य पाहता येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी पूर्ण वेळ बस स्टॉप थांबून मुला-मुलींची काळजी घेऊन त्यांना शांततेचे आवाहन केले.

शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास बस स्टॉपवर आटाळे येथून एक ते दोन किलोमीटर पायी ये-जा करतात. थेट कंडक्टर व ड्रायव्हर यांनी वाहतूक नियंत्रक दीपक बोरसे यांच्याशी फोनवर संवाद साधला. ८.५० बस सकाळी बंद केलेली बस ती पूर्ववत सुरु केली असल्याने त्यांनी सांगितले. अमळनेरचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here