साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी
नरडाणा उद्योग वाढीसाठी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु मागील काळात सिमेंट कंपन्यांमुळे या भागातील विहीरींना लालसर पाणी येत असल्याने शेतकऱ्यांनी रासायनिक कंपन्यांना विरोध केला आहे.भविष्यात या भागात कोणत्याही रासायनिक कंपन्यांनी उद्योग उभारू नयेत किंवा अशा त्रासदायक उद्योजकांना जागाच देवू नये, असा इशारा भाजपचे माजी तालुका अध्यक्ष नथा वारुळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योग उभारल्यास उद्योग मंत्र्यांचा पुतळा दहन करण्याचा इशारा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नथा वारुळे यांनी दिला आहे. नरडाणा औद्योगिक वसाहतीत शिंदखेडा तालुक्याची जमीन गेली आहे. उद्योग मंत्र्यांनी परस्पर कोणत्याही रासायनिक कंपनीला जागा दिलीच असेल तर लोक या ठिकाणी उद्योग उभा राहू देणार नाहीत. उद्योगमंत्र्यांनी आपल्या भागात रासायनिक उद्योग न्याव्ोत, स्थानिक शेतकरी, लोकप्रतिनिधी या सर्वांचाच रासायनिक उद्योजकांना विरोध असतांना उद्योग मंत्री परस्पर रासायनिक उद्योगांना जागा देत असतील तर प्रसंगी त्यांचा पुतळा दहन करण्यात येईल, असा इशाराही वारुळे यांनी दिला आहे. अगोदरच दुष्काळ पाचवीला पुजलेला असतांना रासायनिक उद्योग नको, असे वारुळे यांनी म्हटले आहे.