साईमत, जळगाव : प्रतिनिधी
भाजपाचे खा.रमेश बिघुडी यांनी अल्पसंख्यांक समाजाबद्दल अत्यंत खालच्या पातळीचे वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ आणि भाजप खासदारचे लोकसभा सदस्य रद्द करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना तक्रार अर्ज पाठविला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष मझहर पठाण, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, युवक सरचिटणीस रमेश पाटील, अल्पसंख्यांकचे प्रदेश सरचिटणीस सलीमभाई इनामदार, आदिवासी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, अल्पसंख्यांकचे जिल्हा कार्याध्यक्ष बरकत अली, माजी नगरसेवक सुनील माळी, अल्पसंख्यांकचे महानगराध्यक्ष रिजवान खाटीक, जिल्हा सरचिटणीस राजा मिर्झा, नइमभाई खाटीक, अब्बास खाटीक, संजय चव्हाण, दानिश खान, जुनेद भाई, राजूभाऊ बाविस्कर आदी उपस्थित होते.