भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी मलकापुरात

0
40

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात महाविजय संकल्प २०२४ अंतर्गत प्रवास दौरा करीत आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रावेर मतदार संघातील मुक्ताईनगर, जामनेर, मलकापूर विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी मलकापूर येथे येणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आपल्या प्रवास दौऱ्यामध्ये मराठा मंगल कार्यालय येथे लोकसभा मतदार संघाचा संपूर्ण आढावा घेण्यासोबतच संघटनात्मक आढावा घेतांना विधानसभा सुपर वारिअर्सशी संवाद साधतील. त्यासोबतच बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक घेतील. तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रभावशाली ठरलेल्या ‘संपर्क से समर्थन’ अभियान अंतर्गत सामान्य जनतेशी हनुमान चौक ते निमवाडी चौकपर्यंत पायी चालत जनतेशी तसेच विविध लाभार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गत ९ वर्षाच्या कालखंडातील पूर्णत्वास गेलेल्या महत्त्वाकांक्षी योजना, झालेली कामे व इतर महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करुन माहिती देतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आ. चैनसुख संचेती यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र भाजपा खामगाव पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते मोहन शर्मा, बीजेवायएमचे प्रदेश सचिव शिवराज जाधव, खामगावचे जिल्हाध्यक्ष यश संचेती, जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, मलकापूरचे शहराध्यक्ष शंकरराव पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव वाघोडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here