Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»Jamner : जामनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता कायम
    जामनेर

    Jamner : जामनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता कायम

    Milind KolheBy Milind KolheDecember 21, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    BJP retains power in Jamner Municipal Council
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नगराध्यक्षांसह २२ जागांवर भाजप विजयी, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा ४ जागांवर प्रवेश

    साईमत/जामनेर /प्रतिनिधी :  

    जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व कायम राखत नगराध्यक्ष पदासह एकूण २२ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाने चार जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेत प्रवेश केला आहे.
    जामनेर नगरपरिषदेतील एकूण १७ नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यापूर्वीच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधनाताई महाजन यांच्यासह नऊ नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित १७ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी जामनेर येथील जळगाव रोडवरील शासकीय आयटीआय येथे पार पडली.

    मतमोजणीदरम्यान भाजपाला सर्व २७ जागा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने चार जागांवर विजय मिळवत भाजपच्या अपेक्षांना धक्का दिला. निकाल जाहीर होताच सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आयटीआयपासून नगरपरिषद व ना. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानापर्यंत विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.

     भाजपाचे विजयी उमेदवार व मते

    भाजपकडून प्रभाग १ अ मधून दत्तू नामदेव जोहरे (१२९७ मते), प्रभाग ३ अ मधून बाबुराव उखडू हिवराळे (१०८२) आणि प्रभाग ३ ब मधून माधुरी गजानन कचरे (१३५१) तर याशिवाय वेणूबाई रमेश माळी (प्रभाग ५ ब-११९९), मुन्नी हारुन पिंजारी (प्रभाग ६ अ-२०६९), बेगम सईदा बी युनुस खान (प्रभाग ६ ब-१७३३), तेजस संजय पाटील (प्रभाग ८ अ-१५२३), शितल गोकुळ माळी (प्रभाग ८ ब-१३२७), आतिष छगन झाल्टे (प्रभाग ९ अ-१८१९), प्रतिभा जितेश (पप्पू) पाटील (प्रभाग ९ ब-१७९६), सुहास बाबुराव पाटील (प्रभाग १२ अ-१६५७) आणि नीलिमा राहुल पाटील (प्रभाग १२ ब-१५३९) यांनी विजय मिळवला.

    राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व मते

    भाजपच्या लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाने चार प्रभागांमध्ये आपले अस्तित्व सिद्ध केले. प्रभाग ४ अ मधून जावेद इकबाल अब्दुल रशीद (१६३९), प्रभाग ४ ब मधून सालेहा अंजुम इरफान शाह (१४३०), प्रभाग ७ अ मधून बतुल बी शेख हुसेन कुरेशी (१६२२) आणि प्रभाग ७ ब मधून परविन बानो शेख नाजीम (१६७०) यांनी विजय मिळवत तुतारीचा झेंडा फडकावला.

     काही मतदारांची ‘नोटा’ बटनाला पसंती

    काही प्रभागांमध्ये मतदारांनी ‘वरीलपैकी एकही नाही’ (नोटा) या पर्यायाचा वापर केल्याचेही दिसून आले. प्रभाग ३ ब मध्ये सर्वाधिक ६१ मतदारांनी नोटाचा वापर केला. अपक्ष उमेदवारांना काही ठिकाणी चांगली मते मिळाली असली, तरी त्यांना विजय मिळवता आला नाही.
    बिनविरोध निवडून आलेल्या.

    भाजप नगरसेवकांमध्ये प्रभाग ११ ब मधून उज्वला दीपक तायडे, २ ब मधून कल्पना रवींद्र झाल्टे, प्रभाग १३ ब मधून किलुबाई जिमल्या शेवाळे, प्रभाग ५ अ मधून संध्या जितेंद्र पाटील, प्रभाग १३ अ मधून महेंद्र कृपाराम बावीस्कर, प्रभाग २ अ मधून श्रीराम वामन महाजन, प्रभाग ११ अ मधून प्रशांत भागवत भोंडे, प्रभाग २ ब मधून पूजा सुभाष पवार आणि प्रभाग १० ब मधून उज्वला मुकुंदा सुरवाडे यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी साधनाताई महाजन या बिनविरोध निवडून आल्या आहेत.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २१ डिसेंबर रोजी हे अधिकृत निकाल जाहीर केले. या निकालामुळे जामनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता पुन्हा एकदा कायम राहिली असून विरोधकांना चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Milind Kolhe

    Related Posts

    Pahur, Taluka Jamner : जोगलखेडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद उत्साहात

    December 20, 2025

    Jamner : पाळधी विद्यालयात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

    December 20, 2025

    Pahur Taluka Jamner : पहूर येथे वाघूर नदीपात्रात कचऱ्याचे ढीग

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.