अडीअडचणी समस्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याच्या दिल्या सूचना
साईमत/यावल/प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची नियोजनबद्ध जय्यत तयारी सुरू झाली आहे. शक्ती केंद्र प्रमुखांनी आपापल्या गावासह शहरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या काय समस्या, अडीअडचणी आहेत, त्या जाणून घ्या, अशा सूचना गुजरात राज्यातील पूर्व मंत्री विनोदी मोरडिया यांनी शक्ती प्रमुखांना दिल्या.
यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शनिवारी, २१ सप्टेंबर २०२४ रोजी शक्ती प्रमुख यांची महत्त्वपूर्ण बैठक गुजरात राज्यातील पूर्व मंत्री विनोद मोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. रावेर विधानसभेच्या तयारीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आपल्या बूथवरती जाऊन कसे काम करायचे…? काय काय कामे करावे…? आदी माहिती सांगताना मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या काय काय समस्या आहेत, हे जाणून घ्यावे. तसेच काम करतांना आपल्याला काय अडचणी येतात… या सर्व वरिष्ठ स्तरावर तात्काळ पोहचाव्यात जेणेकरुन येणाऱ्या अडीअडचणी समस्या आपल्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू या, अशा सूचना त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी सुरेश धनके, प्रदीप पाटील, शरद महाजन, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, यावलचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, हरलाल कोळी, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, ता.सरचिटणीस गणेश नेहेते, नितीन चौधरी, नारायण चौधरी, भाजपा जिल्हा शेतकरी आघाडीचे अध्यक्ष नितीन राणे, हेमराज फेगडे, डॉ.नरेंद्र कोल्हे, नितीन चौधरी, नागेश्वर साळवे, राहुल बारी, पिंटू तेली, दीपक चौधरी, पंकज पाटील, श्याम महाजन, भरत चौधरी, अतुल भालेराव, पी.डी.चौधरी, पी.एस.सोनवणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, जिल्हा उपाध्यक्ष भूषण नेहते, शरद कोळी, मुकेश कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, सरला कवडीवाले, शहर सरचिटणीस योगेश चौधरी, भरत धनगर, राजू पाचपांडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.