अध्यक्षपदी ॲड. कृतिका आफ्रे, कोषाध्यक्षपदी सरला पाटील
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रवि अनासपुरे, खा.श्रीमती स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे, आ मंगेश चव्हाण, आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार जिल्हाध्यक्षा अॅड. कृतिका जगदीश आफ्रे यांनी भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी ॲड. कृतिका जगदीश आफ्रे (पारोळा), सरचिटणीस नूतन पांडुरंग पाटील(भडगाव), साधना रवींद्र देशमुख (पिंपळगाव हरे.), दीक्षा अर्जुन गायकवाड (धरणगाव), सविता अनिल नागरे (सायगाव), वैशाली प्रवीण पाटील (जानवे), उपाध्यक्षपदी कविता प्रफुल्ल पवार (पातोंडा), प्रमिला मधुकर रोकडे (धरणगाव), माधुरी प्रमोद पाटील (अमळनेर शहर), सरला राजेंद्र पाटील (पाचोरा शहर), पल्लवी समाधान पाटील (एरंडोल), मंगला सिद्धार्थ पवार (नगरदेवळा), रेखा सुरेश पाटील (भडगाव), कविता किशोर नारखेडे (खंडेरावनगर), संगीता राजेंद्र पाटील (पाळधी), मनीषा राजेंद्र पगार (चाळीसगाव शहर), कविता भागवत चौधरी (पारोळा), कोषाध्यक्षपदी सरला लहू पाटील (कासोदा) आदी महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.