रॅलीतील सहभागी देशभक्तांनी हातात घेतलेल्या ‘तिरंग्याने’ वेधले लक्ष…!
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील बळीराम पेठेतील ‘वसंत स्मृती’ भाजपाच्या कार्यालयात मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० भारत मातेच्या माल्यार्पणासह पूजन करून रॅलीला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिन उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक १च्यावतीने तिरंगा पदयात्रा रॅली आयोजित केली होती. ही रॅली जळगावच्या खा.श्रीमती स्मिताताई वाघ, जळगावचे आ. सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.
यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, मंडळाध्यक्ष आनंद सपकाळे, हर घर तिरंगा व रॅली महानगर संयोजक जयेश भावसार, माजी महापौर भारती सोनवणे, उदय भालेराव, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भैरवी पलांडे, राजू मराठे, उपाध्यक्ष नितीन इंगळे, जितेंद्र मराठे, मंडळ सरचिटणीस उमेश देशपांडे, राहुल सनकत, महेश चौधरी, माजी मंडलाध्यक्ष संजय शिंदे, शक्ती महाजन, गोपाळ पोपटाणी, परेश जगताप, किशोर चौधरी, नीलू तायडे, स्वप्निल साखळीकर, सुनील जाधव, प्रल्हाद सोनवणे, तुषार सूर्यवंशी, शिवाजी पवार, शुभम विंचवेकर, विजय पिंगळे, भरत कर्डिले, रेखा राणा, संगीता पाटील, दर्शना सपकाळे, तारा पटेल, राजश्री सोनवणे, चित्रा मालपाणी, दीपक कोळी, रवींद्र पाटील, प्रल्हाद सोनवणे, कन्हैया गवळी, दिलीप नाझरकर, प्रकाश सोनवणे, सोहम खडके, वसीम शेख, दीपक सुरडकर, हरीश तेली, स्वामी पोतदार, अमित माळी, भूषण शिंपी, जयंत चव्हाण, अर्जुन भारुडे, हर्षल शिकवाल, वसीम शेख, इरफान खान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
