साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बीसारा लेडीज रनच्या सराव सत्रास नुकताच उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पन्नासहून अधिक महिलांची उपस्थिती लाभली. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून स्वतः उत्तम धावपटू असलेल्या भुसावळ वाहतूक शाखेच्या प्रमुख ए.पी.आय. रुपाली चव्हाण उपस्थित होत्या.
सुरुवातीला ६ वाजता प्रा.प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनात वॉर्म अप व्यायाम प्रकार घेण्यात आला. त्यानंतर ६ वाजून १० मिनिटांनी उद्घाटनाचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानासमोर आर.पी.डी.रस्त्यावर झाला. सुरुवातीस डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी रुपाली चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी रुपाली चव्हाण आणि रनमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या चंपा जहांगिड यांच्या हस्ते नारळ वाढवून सराव सत्राचे विधिवत उद्घाटन केले. यावेळी डॉ.तुषार पाटील, गणसिंग पाटील, ब्रिजेश लाहोटी, प्रवीण वारके, रणजित खरारे उपस्थित होते. त्यानंतर ६.१५ वाजता प्रत्यक्ष धावायला सुरुवात होऊन धावतांना नियमित महिला धावपटू, नवोदित महिला सहभागींना धावण्याचे बारकावे सांगत होते. त्यानंतर ६.५० वाजता पुन्हा मैदानावर परतून स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घेण्यात आला. ७ वाजता सराव सत्राची सांगता झाली. सूत्रसंचालन तथा आभार प्रवीण पाटील यांनी मानले.
लेडीज रन ३ मार्च रोजी ३ कि.मी., ५ कि.मी. व १० कि.मी. या ३ श्रेणींमध्ये आयोजित केला असून नावनोंदणी सुरु आहे. त्यासाठी जामनेर रस्त्यावरील नेहेते हॉस्पिटल येथे डॉ.नीलिमा नेहेते (९३२५६३८७१७) किंवा पंचमुखी हनुमान मंदिराजवळील सुप्रभा हॉस्पिटल येथे डॉ.चारुलता पाटील (९८२३७९९७५८) यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच ऑनलाईन पद्धतीनेही टाऊनस्क्रिप्ट संकेत स्थळावर नावनोंदणी शक्य आहे. त्यासाठी प्रवीण पाटील (९४२२७७२१७८) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.