Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; तीन जण जखमी
    पाचोरा

    भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार; तीन जण जखमी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

    शहरातील भडगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात श्रीकृष्ण नगरातील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भूषण संतोष हटकर (वय २०, रा. श्रीकृष्ण नगर, पाचोरा) असे मृत तरूणाचे नाव आहे.

    सविस्तर असे की, जळगाव चौफुलीजवळील श्रीकृष्ण नगर परिसरातील रहिवासी भूषण संतोष हटकर (वय २०) आणि प्रवीण नाना हटकर (वय २२) हे दोघे मित्र दुचाकीवरुन (क्रमांक एमएच १९ ई डी २१९६) मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घरी जात होते. दरम्यान जारगाव चौफुलीकडून (क्र.एमएच १५ बीएन १०३५) मधील दोघेजण भडगाव रस्त्याकडे जात असतांना दोन्ही वाहने एकमेकांवर आदळले. त्यात दुचाकीस्वार भूषण संतोष हटकर हा जागेवर ठार झाला तर त्याच्या मागे बसलेला प्रवीण नाना हटकर याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. चारचाकी वाहनातील देशमुखवाडी परिसरातील दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील मयत भूषण संतोष हटकर हा खासगी व्यक्तीकडे सेंडीग कामावर मजूरी करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. तर जखमी प्रवीण नाना हटकर हा आई-वडिलास एकुलता एक मुलगा आहे. तो बाजार समितीत हमाली काम करतो. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026

    Pachora : अनुदानासाठी लाच मागणाऱ्यांना लाचलुचपतचा दणका

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.