मिझोराममध्ये झेडपीएमचा मोठा विजय सत्ताधारी एमएनएफचा दारूण पराभव

0
8

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) मोठा विजय संपादन करत ४० पैकी २७ जागांवर विजय मिळवला आहे. राज्यातील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रन्टला (एमएनएफ) केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, भाजपालाही २ जागांवर यश मिळाले आहे. तर काँग्रेसला केवळ एकच जागा मिळवता आली. राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर काँग्रेसला मिझोराममध्येही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विशेष म्हणजे मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट, मिझो नॅशनल फ्रन्ट आणि काँग्रेस पक्षात त्रिशंकू लढत होण्याची अपेक्षा होती. पण या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपशेल अपयश आले आहे. २०१८ मधील खराब कामगिरीनंतर काँग्रेस पुनरागमन करण्याची आशा होती. मिझोराममध्ये तुलनेनं कमी राजकीय ताकद असलेल्या भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here