ठाकरेंना मोठा धक्का : ‘या’ बड्या नेत्याने दिला शिवसेना नेते पदाचा राजीनामा !

0
13

साईमत लाइव्ह 

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मनाला जातो. ठाकरे यांना आडसूळ यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रता आडसूळ यांनी आपली खदखद व्यक्त केली.

ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसेच आजारपणात विचारपूसही न केल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. सिटी कोऑपरेटिव्ह कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यावेळी पक्षाने साधी विचारपूस केली नसल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील उद्धव ठाकरे पाठीशी उभे राहिले नाही. अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ हे एकनाथ शिंदे गटासोबत अगोदरपासूनच आहेत. आता अडसूळ यांनीही राजीनामा दिल्याने ते शिंदे गटात समील होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. सिटी को-ऑपरेटीव्ह बँक या बँकेचे अडसूळ अध्यक्ष होते. त्यांचे नातेवाईक हे संचालक मंडळावर होते. या बँकेचा टर्नओव्हर सुमारे 1 हजार कोटींच्या आसपास होता. ही बँक आता दोन वर्षांपासून बुडीत निघाली आहे. कर्ज वाटपात अनियमितता आणि एन. पी. ए. मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक अडचणीत सापडली आहे. दरम्यान शिवसेनेत नेतेपद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. शिवसेनेत सध्या नऊ जण हे नेतेपदावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here