नंदुरबार : वृत्तसंस्था
राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं चित्र आहे. यामुळे रस्तेही पाण्याखाली गेले आहे. अशात आता विसरवाडी गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. महामार्गावर तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असून पावसामुळे वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे.
नवापूर तालुक्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. यामध्ये नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. अशात पावसाचा जोर वाढल्यामुळे नेसू, सरपणी, नागण नद्यांना पूर आला आहे. यामुळे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. संबंधित वाहतूक अजून काही तास खोडांबळण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या मार्गावरून वाहतूक वळवली असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातकडून येणाऱ्या गाड्या नंदुरबार मार्गे आणि गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या दहिवत मार्गे वळवण्यात आल्या असून यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.