साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील जामनेरपूरा भागातील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी भूषण भगवान बराडे याने शिवगंगा रूप बेळगाव (कर्नाटक) रोज यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या रोलर स्केटींग स्पर्धेत १०० मीटर अंतर हे ११.२१ सेकंदात पूर्ण करुन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव समाविष्ट केले आहे. तो जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भगवान वराडे यांचा चिरंजीव आहे.
भूषणला प्रशिक्षक आनंद मोरे आणि जे.सी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. भूषणने कमी वयात जामनेर, वंजारी समाज, इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय, त्याचे मार्गदर्शक आणि त्याच्या आईवडिलांचे नाव लौकीक केले आहे.
याबद्दल जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक वृंद, नागदेवता भोजनालयाचे संचालक तथा माजी सैनिक किशोर पाटील, सावरला जि. प. शाळेचे सर्व शिक्षक वृंद, तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षक बांधव, मित्रपरिवार, समाज बांधवांतर्फे भूषणवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.