साईमत, भुसावळ – प्रतिनिधी
सीबीएससी बोर्डमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडिअम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीत प्रथम नमामि लक्ष्मण प्रजापती ९५ टक्के तसेच एसएसटी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. शुभीका स्वर्णकार ९४ टक्के, हितेन सुरंगे ९३ टक्के, हमीद आसिफ इक्बाल शेख ९२ टक्के, अशितोष सुरेश चावराई ९१.४० टक्के गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील डॉ. वैभव पाटील व मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी कौतुक केले.
बारावीच्या निकालातही नेत्रदिपक कामगिरी
भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कुलच्या बारावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करीत यश संपादन केले. बारावीचा निकालही १०० टक्के लागला आहे. त्यात सत्यम कटियार ९२.२० टक्के, अभिजीत आनंद ९१.२० टक्के, सार्थक निगम ८९.६० टक्के, निधी दीपक जावळे ८७.२०टक्के, आशितोष कुमार देवनगन ८६.६० टक्के गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील डॉ. वैभव पाटील, मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी कौतुक केले.
