भुसावळ शहर गोळीबाराने हादरले; दोघांची प्रकृती चिंताजनक

0
18

भुसावळ : येथील जळगाव नाक्यावरील मरीमाता मंदिरासमोर काही अज्ञात हल्लेखोरांनी दोन जणांवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी २९ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे भुसावळ शहर हादरले असून शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे घटनास्थळी शहर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान, खूनी हल्ला चढविण्याचा अगोदर भारत नगर परिसरात झाला गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला.  यामुळे हल्लेखोरांचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

या हल्ल्यात माजी नगरसेवक तथा मेहतर समाजाचे नेते संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सामाजिक कार्यकर्ते दिनेश राखुंडे या दोघांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. हे दोघे त्यांच्या चारचाकी वाहनाने (क्र.एम.एच. १९, ईजी ०१८७) ते भुसावळकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.मात्र हल्लेखोरांची संख्या समजू शकली नाही.  दोघांना हल्ल्यानंतर ामा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते.  त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शहरातील डॉ.मानवतकार यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे सांगण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला त्याचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here