भुसावळ स्पोर्ट्‌स ॲड रनर्स असोसिएशनने साजरे केला एकत्रित ‘रक्षाबंधन’

0
16

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ स्पोर्ट्‌स ॲड रनर्स असोसिएशनचे शेकडो पुरुष व महिला धावपटू दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी एकत्रित धावण्याचा सराव करीत असतात. या धावपटूंमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. महिला व पुरुष धावपटू भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याने संपूर्ण भुसावळ शहरास सुदृढ आरोग्याचा संदेश देतात. त्यामुळे यावर्षी सर्व पुरुष व महिला धावपटूंनी एकत्रित क्रीडांगणावर ‘रक्षाबंधन’ सण साजरा केला.

सुरुवातीस सकाळी ५.३० ते ६.३० दरम्यान प्रत्येक धावपटूने ७ ते ८ कि.मी. धावून अंतर पूर्ण केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर परतल्यावर सर्व महिला धावपटूंनी सर्व पुरुष धावपटूंना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेह व गोडवा वृद्धिंगत केला. यावेळी सर्व पुरुष धावपटूंनी कृतार्थ भावनेने आपल्या सर्व बहिणींचे आरोग्य व विशेषतः बाहेरगावी मॅरेथॉनला गेल्यावर अधिक काळजी घेण्याचे ठरविले.

यावेळी डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, पूनम भंगाळे, एकता भगत, डॉ.वर्षा वाडिले, दीपा स्वामी, अर्चना चौधरी, माधुरी चौधरी, किर्ती मोटाळकर, स्वाती भोळे, नीलांबरी शिंदे, विनिता शुक्ला, सुनीता वाघमारे, ममता ठाकूर, चारुलता पाटील, पुष्पा चौधरी, सरला पाटील, मंगला पाटील, रूपा अग्रवाल या भगिनींनी राख्या बांधून सर्व भावांना मिठाई भरवून नात्यातील गोडवा अधिक वृद्धिंगत केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here