सौर ऊर्जेमुळे भुसावळ रेल्वे विभागाला झाली एक कोटीची बचत

0
83

रेल्वे विभागाने विजेच्या गरजांसाठी सुरू केला सौर ऊर्जेचा वापर

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :

मध्य रेल्वेने आपली विजेची गरज भागविण्यासाठी हरित आणि अक्षय ऊर्जेचा वापर करण्यासाठी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली आहे . त्यामुळे भुसावळ विभागाने सौर ऊर्जेचा वापर करून एक कोटी नऊ लाख रुपयांची बचत केली आहे. यामुळे भुसावळच्या जंक्शन स्थानकात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्य रेल्वेने अक्षय ऊर्जाचा सध्या ट्रैक्शन व नॉन-ट्रैक्शन वापर करीता हरित व नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचा उपयोग सुरू केला आहे. मध्य रेल्वेच्या जुलै – २०२४ पर्यंत सर्व पाच विभागांमध्ये २०५ ठिकाणी सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत . यामध्ये मुंबई विभागातील ४७ ठिकाणी तर नागपूर ५८, पुणे ५० , भुसावळ ३२, आणि सोलापूर १८ असे सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या विजेच्या गरजांसाठी पुरेशी उर्जा उपलब्ध होत असून महसुलातही मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.

आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये मध्य रेल्वेच्या ५ विभागातील सौर पॅनेलने ८.०४ एमयू (दशलक्ष युनिट) ऊर्जा निर्माण केली असून ती ६५९४ . ८१ टन कार्बन फूट प्रिंट कमी करण्याइतकी आहे. यामध्ये मुंबई विभागातील ५.५६ एमयू वीजनिर्मिती (४५५७.१७ टन कार्बन फूट प्रिंटच्या बचतीच्या समतुल्य), भुसावळ विभागात १.३५ एमयू (कार्बन फूट प्रिंट ११०८.७६ टन ), ०.९६ एमयू (पुणे विभागासाठी ०.९६ टन) ७८४.४४ टन कार्बन फूट प्रिंट), नागपूर विभागावर ०.०९ एमयू (७६.८० टन कार्बन फूट प्रिंट) आणि सोलापूर विभागावर ०.०८ एमयू (६७.६१ टन कार्बन फूट प्रिंट ) आहे. तर २०३० पर्यंत भारतीय रेल्वे मिशन “ कार्बन न्यूट्रल ” साध्य करण्यासाठी इतर रेल्वेंना देखील प्रेरित करीत आहे . सौर ऊर्जेचा वापर करून आणि हरित पृथ्वीच्या भारतीय रेल्वेच्या उद्दिष्टात महत्त्वपूर्ण योगदान देऊन अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा लाभ घेण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध असल्याचे मध्य रेल्वेच्या सुत्रांनी सांगितले.

भुसावळ विभागाची एक कोटीची बचत

या उपक्रमांमुळे पाच विभागात ४.६२ कोटींची बचत झाली आहे. यामध्ये मुंबई विभागाची २.६६ कोटी, भुसावळ १.०९ कोटी, पुणे ०.६९ लाख, नागपूर ०.१० लाख आणि सोलापूर विभागाला ०.०८ लाख रुपयांची बचत झाली आहे. यामुळे भुसावळ रेल्वेच्या जंक्शन विभागात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here