भुसावळ न.प.ला बोचते अतिक्रमण!

0
15

साईमत भुसावळ प्रतिनिधी

दैनदिन सुविधांचा बोजवारा, पाणी १२ दिवसांनी, रस्त्यांची दुर्दशा, पथदिवे बंद, कोट्यवधी खर्चूनही कचरा तसाच….

शहरातील नागरीक नगरपालिकेचे करदाते म्हणजेच एका अर्थाने सुविधांवरचे दावेदारही आहेत. त्यांना दैनदिन सुविधांसाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मात्र, भुसावळ न.प.ला हातावर पोट असणाऱ्यांचे, हातगाड्यांवर खाद्यपदार्थ व किरकोळ विक्री करणाऱ्यांचेच अतिक्रमण का बोचते ?, असा सवाल करीत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी न.प. प्रशासकांना भानावर येण्याचे आवाहन केले आहे.
भुसावळ शहरात पाणी १२ दिवसांच्या फरकाने येते, चालण्यासाठीही व्यवस्थित रस्ते नाहीत. शहरात हजारो पथदिवे बंद आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, कचऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावर मात्र कचराच कचरा दिसतो.

असे असतांना शहरातील काही हातमजुर पोट भरण्यासाठी व कुंटुबांचा उदरनिर्वाहाच्या चिंतेत असणारे हातगाडीवर सामान, खाद्यपदार्थ विकणारे यांचे अभिक्रमण काढणार असे वारंवर सांगितले जाते. यामुळे येणाऱ्या दसरा-दिवाळी सारख्या सणांसाठी मोठ्या आशेने दोन पैसे मिळवून कुटुंबाची दिवाळी साजरी करण्याच्या आशेवर असणाऱ्या या नागरीकानां चिंता सतावू लागली आहे. तुम्हाला नगरपालिकेतर्फे इमानदारीने काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर आधी तुम्ही दैनदिन सुविधा सुरळीत करा मग लोकांच्या मनाशी खेळ करा, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

शहरात नगरपालिका कोट्यवधी रुपयांचे टेंन्डर काढते कागदावर कामे दाखविते परंतु कामाबाबत कुठेही दर्जा नाही, रस्त्यांच्या कामांची दुर्दशा, कचऱ्यात भ्रष्टाचार, मुताऱ्या, सार्वजनिक संडासाची दयनिय परिस्थिती, पिण्याच्या पाण्यासाठी भटकती, जनतेला नगरपालिका पाणीपट्टी सोबत टँकरचाही भुर्दड द्यावा लागतो. अशी हलाखीची परिस्थिती असतांना कशाला अतिक्रमण काढण्यासाठी तुमची मर्दानगी दाखवता?. त्यापेक्षा नागरीकांना दरोरोजच्या दैनदिन व्यवस्था द्या, अशा शब्दांमध्ये जाणकारांकडूनही न.प. प्रशासकांचे कान उपटले जात आहेत.

आता तर नविन पॅटर्न आले आहे. सकाळी सकाळी सायकलीवर अधिकारी वसुली करतात, अशीही चर्चा कानावर पडते आहे. भ्रष्टाचारासाठी निविदा ठेकेदारांच्या मर्जीनुसार काढण्यात येतात. तुम्ही पाण्याच्या पाईपलाईनचेे लिकेजचे कोट्यवधी रुपयांचे वार्षिक खर्च दाखवितात पण शहराता प्रत्येक गल्लीत दररोज लिकेज दिसते मग लिकेजेस दुरुस्ती फक्त कागदावर सुरु आहे का?. या लिकेजसचा तुम्ही पुन्हा टेन्डर काढून मलिदा खाण्यासाठी एक मोठा प्लॅन नगरपालिकेने आखला आहे आणि त्यातून जनतेच्या तोंडाला कर घेऊन पाने पुसून त्यांच्या जिवाशी खेळ सुरु केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी न.प. प्रशासकांना दिलेल्या पत्रात केली आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष स्टींग ऑपरेशन करणार

नगरपालिकेच्या कोणत्या कामासाठी, कोणत्या टेबलवर ,कोणता अधिकारी, किती पैसे घेतो, यासाठी मोठी गुप्त मोहीम राबवुन स्टींग केले जाईल , अशा इशाराही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने दिला आहे. नगरपालिकेच्या काही विशिष्ट विभागात सर्रास कामकाजाच्या वेळेत मद्यप्राशन करण्यासाठी दुकान लावले जाते. मद्यप्राशन करुन काही अधिकारी मनमानीने वागतात, असाही आरोप केला जातो आहे.

१२ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा हा जनतेला नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे. अतिक्रमण काढण्याच्या विषयांवर जेवढा वेळ देता तेवढा वेळ जर पाणी पुरवठा करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्यावर दिला तर जनतेचा त्रास कमी होईल. अतिक्रमण काढायचे झालेच तर सर्रास पूर्वी ज्यांनी अतिक्रमण केले व मोठे व्यवसाय थाटले, त्या दुकांनाना पुर्वीच्या मुख्याधिकारी यांनी सिल ठोकले होते ते सिल चिरीमीरी घेऊन काढून दिले आणि गरीबांवर अन्याय करता हे खपवून घेणार नाही तुम्ही फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अभय दिले नाही तर शहरात तुमच्या विरोधार मुक मोर्चा काढण्यात येईल. या सर्वच विषयांबाबत आपण आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा व संबंधित विषयांची सखो चौकशी करावी , अशी विनंती उमेश नेमाडे यांनी या पत्रात केली आहे.

या पत्राच्या प्रती उमेश नेमाडे यांनी न.प. प्रशासकांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुर्नवसन मंत्री ना. अनिल पाटील व जिल्हाधिकारी आदींनाही पाठवल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here