किरकोळ कारणावरून वाद, लोखंडी पाईपने प्रहार; पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला
साईमत / भुसावळ / प्रतिनिधी
भुसावळमधील आगाखान वाडा परिसरात पैशाच्या किरकोळ वादातून दोन्ही गटात झालेल्या भीषण हाणामारीत फिर्यादी तरुणासह त्याची पत्नी आणि वृद्ध वडील गंभीर जखमी झाले आहेत. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
वादाचा तपशील : मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख शेख हसिद उर्फ मुन्ना (वय २८, रा. आगाखान वाडा) यांनी जमिना रउफ कुरेशीकडून ४ हजार रुपये घेतले होते. पैसे परत मागितल्यावर शाहरुख यांनी “मी तुमचे पैसे परत केले आहेत” असे सांगितले. यावरून संशयित आरोपी रहिम रउफ कुरेशी आणि जमिला रउफ कुरेशी यांनी शाहरुख यांच्यावर राग व्यक्त करत शिवीगाळ सुरू केली.
हाणामारीत रूपांतर : शाब्दिक वाद काही वेळात हाणामारीत बदलला. जमिला कुरेशी हिने रस्त्यावर पडलेला लोखंडी पाईप उचलून शाहरुख यांची पत्नी फरहीन हिच्या कमरेवर आणि गुडघ्यावर प्रहार केला. तसेच, रहिम रउफ कुरेशी यांनी घरातून लोखंडी वस्तू आणून “पैसे दे नाहीतर तुला जीवाने मारून टाकीन” अशी धमकी देऊन मारहाण केली.
जखमींचा तपशील भांडण सोडवण्यासाठी आलेले शाहरुख यांचे वडील हसिद उर्फ मुन्ना आणि भाऊ मोहसिन शेख यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. या घटनेत शाहरुख, त्यांची पत्नी फरहीन आणि वडील हसिद गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिस कारवाई : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल तेजस पारिसकर करत आहेत.
