मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपुजन
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील वरखेडी तांडा येथे विविध विकास कामांचा भुमिपुजन सोहळा राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नुकताच झाला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अब्दुल सत्तार यांनी येथील महिला भगिनींशी संवाद साधत त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री, श्रावण बाळ, तीर्थयात्रा आदी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. वरखेडी तांडा येथील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळाला. याबाबत महिलांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल उपस्थित महिलांनी अब्दुल सत्तार यांचे आभार मानले.
याप्रसंगी सिल्लोडचे माजी सभापती रामदास पालोदकर, माजी जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, धरमसिंग चव्हाण, शिवसेना गटनेता अक्षय काळे, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, तहसीलदार मनीषा मेने, नायब तहसीलदार सतीश भदाणे, जलसंधारण विभागाचे सूर्यकांत निकम, सोयगाव नगर परिषदेतील जंगला तांडाचे सरपंच विनोद जाधव, विशाल चव्हाण, सुरेश चव्हाण, श्रावण जाधव, उमर पठाण, शफीक खा यांच्यास ग्रामस्थ उपस्थित होते.