साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील हातगाव येथे राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिर भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विधिवत पूजन करुन मंदिर बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री एम.के.आण्णा पाटील, शिक्षक आमदार किशोर दराडे, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, उद्योजक सतीश दराडे, वंजारी समाज भूषण बाळासाहेब सानप, जिल्हा चिटणीस ॲड. प्रशांत पालवे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, बाजार समितीचे संचालक किशोर पाटील यांच्यासह भगवान बाबा उत्सव समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी पंचक्रोशीतील समाज बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.