बेरोजगारांना रोजगारासाठी राजू भाेई यांनी व्यक्त केला होता मानस
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी
नोकरीचे प्रमाण कमी झाल्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळावा, शहरात नवीन उद्योग व्यापार सुरु झाल्यास बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, लहान-मोठ्या उद्योग व्यवसायांनाही चालना मिळेल, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजू भाेई यांनी सुरभी मंगल कार्यालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. अशा सुरभी मंगल कार्यालयाचे भूमिपूजन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, यावल शेतकी संघाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन शरद महाजन, सुनील वाढे, अनिल नारखेडे, सतीश अग्रवाल भुसावळ, मनोज कुमार पाटील, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष बापू वाघुळदे, रवींद्र होले, देविदास चौधरी, नागरी पतपेढीचे चेअरमन चंद्रशेखर चौधरी, माजी नगरसेवक विश्वनाथ कापडे, माजी नगरसेवक सुनील वाढे, फैजपूर वि.का.सोसायटीचे चेअरमन केतन किरंगे, प्रफुल्ल कासार, प्रभात चौधरी, विलास बोरोले, भरत चौधरी, राजू भाेई, मयूर भाेई, पत्रकार योगेश सोनवणे, नंदकिशोर अग्रवाल आदींची उपस्थिती होती.