साईमत, यावल : प्रतिनिधी
अयोध्या येथे सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यावल शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात विविध मंदिरांमध्ये आणि ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. तसेच भगव्या पताका, झेंडे मोठ्या उत्साहाने लावली जात आहेत. तालुक्यातील विरावली येथे संपूर्ण गाव ‘भगवेमय’ झाले. संपूर्ण परिसरात श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे.
विरावली येथे राममंदिर प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त विरावली येथे मंदिरासह गावात सजावट करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सभापती कृऊबास यावल मुन्ना पाटील, उपसरपंच ईश्वर पाटील, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, समाधान पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, भागवत पाटील, कैलास पाटील, विरावलीकर महिला मंडळ, विरावलीकर भजनी मंडळ यांच्यासह समस्त विरावलीकर ग्रामस्थ उपस्थित होते.