शेकोटी कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कुलमध्ये स्काऊट-गाईडचे शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराचा उद्देश के. पी. पाटील यांनी स्पष्ट करुन सांगितला. यावेळी स्काऊट प्रमुख डॉ. व्ही. एस. पाटील यांनी स्काऊट-गाईड यांना स्काऊटचे नियम, ध्येय, वचन, बेडन पॉवेल व्यायाम, दोरीच्या गाठी, स्कार्फची बंधने, स्ट्रेचर बनविणे तसेच प्रथमोपचार याविषयी प्रात्यक्षिकासह उपयुक्त, अशी माहिती सांगितली.
गाईड प्रमुख रत्नमाला सपकाळे यांनी सर्व गाईड कॅप्टनच्या मदतीने भेळ बनवली.यावेळी स्काऊट- गाईड यांनी भेळचा आस्वाद घेतला. शेवटी शेकोटी कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. शेकोटी कार्यक्रमात बहारदार गीते सादर करण्यात आली. शिबिराची सांगता ‘वंदे मातरम्’ गीताने करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. पी.निकम यांनी सर्वांना स्काऊट- गाईडला मार्गदर्शन केले. यावेळी पर्यवेक्षक के. आर. पाटील, स्काऊट प्रमुख डॉ. विजय पाटील, गाईड प्रमुख रत्नमाला सपकाळे, स्काऊटर्स किरण चौधरी, किशोर पाटील, डॉ.आर. डी. कोळी,गाईडर्स वैशाली बाविस्कर, वैशाली भदाणे, संगीता बेहडे आदी उपस्थित होते.
