परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रासह पुष्पगुच्छ देऊन गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलचा अखंड १४ वर्षापासून सलग १०० टक्के इंग्रजी ग्रामर परीक्षेचा निकाल लागलेला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे अंतर्गत भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी एलिमेंटरी, इंग्रजी ज्युनियर, इंग्रजी सिनीअर, इंग्रजी ग्रामरच्या परीक्षा घेतल्या जातात. सर्वात विशेष बाब म्हणजे शाळेचा निकाल १४ वर्षापासून १०० टक्के लागत आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक किशोर पाटील, किरण पाटील १४ वर्षापासून शाळेव्यतिरिक्त सकाळी ११ ते १२ व प्रत्येक रविवारी सकाळी १०ते १२ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन केले जाते. त्याचेच चांगले परिणाम म्हणजे इंग्रजी ग्रामर परीक्षेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. १४वर्षात दोन हजार २७२ विद्यार्थ्यांनी इंग्रजी ग्रामरची परीक्षा दिली आहे. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून व शाळेचा निकाल १०० टक्के अखंडपणे सुरु आहे.
ग्रामर परीक्षेत शाळेतून प्रथम अहिरराव लिना रवींद्र-७१ गुण, पवार योगिनी अमरसिंग-७१ गुण, द्वितीय : बोरसे पूर्वेश ज्ञानेश्वर-७० गुण, चेत्ते रिजुल विलास-७० गुण, तृतीय : भालेराव हिमांशू शरद–६९ गुण ह्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
दोन्ही उपक्रमशील शिक्षकांचेही कौतुक
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम, उपमुख्याध्यापक जे.एस.चौधरी, शाळेचे पर्यवेक्षक के.आर.पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस.डी.भिरूड, शिक्षिका संगीता पाटील, किशोर पाटील, किरण पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक किशोर पाटील आणि किरण पाटील यांनी १४ वर्षापासून विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी व्याकरणाचे धडे व सराव करून शाळेव्यतिरिक्त मार्गदर्शन करतात. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापकांनी दोन्ही उपक्रमशील शिक्षकांचेही अभिनंदन केले.