भगीरथ शाळेचे आर. डी. कोळी यांच्या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार

0
12

मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख पारितोषिकासह पुस्तक देऊन सन्मान

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

स्व. बाबासाहेब के.नारखेडे स्मृतीप्रित्यर्थ नुकत्याच शिक्षकांसाठी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात भगीरथ इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक, कवी आर. डी. कोळी यांच्या ‘चला, मैत्री करू या पुस्तकांशी…!’ या कवितेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख पारितोषिक व पुस्तक देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

यापूर्वी श्री.कोळी यांच्या ‘बाप’ या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे आर. डी. कोळी हे समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत. गेल्या दहा वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी साहित्य कट्टा, पुस्तक प्रदर्शन, फिरते वाचनालय, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन, व्याख्यान, प्रश्नामंजुषा आदी उपक्रम राबविले आहेत.

वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारी कविता

‘चला, मैत्री करूया पुस्तकांशी…!’ ही कविता पोस्टर कवितेच्या स्वरुपात लवकरच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारी व मानवी जीवनात पुस्तकांचे महत्त्व पटवून देणारी ही कविता असल्याचे कवी आर.डी.कोळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here