भगीरथ शाळेत देशभक्ती गीतगायन स्पर्धा उत्साहात

0
19

दहावीची विद्यार्थिनी चेतना सुतार प्रथम

साईमत/जळगाव/प्रतिनिधी:

येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी -भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. त्यात प्रथम क्रमांक चेतना दिलीप सुतार, द्वितीय तृप्ती महेंद्र माळी, तृतीय तेजस्विनी शरद कंडारे, उत्तेजनार्थ पियुष युवराज मगरे यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका संगीता पवार तसेच सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक चंद्रशेखर पिंपरकर यांनी केले.

स्पर्धेचे आयोजन ज्येष्ठ शिक्षक आर.डी. कोळी, आर. डी. पाटील यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस. चौधरी, पर्यवेक्षक के.आर. पाटील, गणेशोत्सव समिती प्रमुख संगीता पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.डी. पाटील तर आर.डी. कोळी यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here