विद्यार्थ्यांकडून वाचनाचा संकल्प, ग्रंथ प्रदर्शन भरविले
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील सानेगुरुजी कॉलनीतील स्थित कै. सुनिता जगन्नाथ वाणी-भगीरथ इंग्लिश स्कुलमध्ये बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आणि वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम यांच्या हस्ते पूजनासह माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वाचन प्रेरणादिनी सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाचा संकल्प केला. तसेच शाळेत ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम, उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, डॉ. अशोक पारधे, आर. डी. कोळी, किरण पाटील, ग्रंथपाल ऋषिकेश जोशी, मयुरी कोळी, चांदणी सूर्यवंशी, मानसी बडगुजर, स्पर्श पाटील, नंदिनी पाटील, पियुष पाटील, सात्विक पाटील, मोहित लोखंडे, अथर्व सोनार, लावण्या तायडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक आर. डी. कोळी यांनी केले.