नंदिनीबाई विद्यालय ‘बेस्ट इंटरॅक्ट क्लब’चे मानकरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील रोटरी क्लब जळगावतर्फे आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट इंटरॅक्ट ज्ञानसंकल्प परिषदेत लोकगीत समूह नृत्य स्पर्धेत भगीरथ इंग्लिश स्कुलने तर देशभक्तीपर गीत स्पर्धेत ए.टी.झांबरे विद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. जैन हिल्स येथे झालेल्या परिषदेत बेस्ट इंटरॅक्ट क्लबचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी नंदिनीबाई मुलींचे विकास विद्यालय ठरले तर जिजामाता माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळविला. समूहनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक नंदिनीबाई मुलींचे विकास विद्यालय तर तृतीय क्रमांक पाचोरा शाळेने मिळविला. स्पर्धेचे परीक्षण डॉ. शमा सराफ व स्नेहा भुसारी यांनी केले.
देशभक्तीपर गीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक नंदिनीबाई मुलींचे विकास विद्यालय यांनी तर तृतीय क्रमांक पाचोरा विद्यालयाने प्राप्त केला. स्पर्धेसाठी स्मिता पाटील व आदिती कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ‘टाकाऊतून टिकाऊ’ स्पर्धेत चिनार कोल्हे याने प्रथम तर प्रणाली भोळे हिने द्वितीय पारितोषिक मिळवले. प्रेरणा शिंदे तृतीय क्रमांकाची विजेती ठरली. डॉ. काजल फिरके व स्नेहा भुसारी यांनी परीक्षण केले. पथनाट्य स्पर्धेत ए.टी. झांबरे विद्यालय प्रथम तर या. दे. पाटील विद्यालयाने द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद मिळविले. जिजामाता माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. परीक्षणाची जबाबदारी स्मिता पाटील, डॉ. शमा सराफ यांनी सांभाळली.
वक्तृत्व स्पर्धेत राशी पाटील हिने प्रथम क्रमांकाचे विजेते पद प्राप्त केले. कृतिका देशमुख व रिया पाटील या विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेचे परीक्षण स्वाती ढाके व डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी केले. सुबोध सराफ यांनी पोस्टर्स स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेत गुंजन अटवाल प्रथम तर श्रावणी जोशी द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले. भावेश्वरी तायडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. निबंध स्पर्धेत भाग्यश्री मराठे हिने प्रथम क्रमांक तर संस्कृती झोपे द्वितीय आणि लावण्या इंगळे तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या. परीक्षक म्हणून डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी काम पाहिले.
