नार-पार प्रकल्पाच्या अगोदर गिरणेचे पाणी मन्याड धरणात, वरखेडे धरणाचे पाणी हिंगोणेपर्यंत आणून तालुका सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणार : आ.मंगेश चव्हाण

0
22

सहकार महर्षी रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने चाळीसगाव येथे ११.६९ कोटींच्या भव्य कृषी भवनाचे भूमिपूजन संपन्न

साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी :

तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या शेतकरी हिताच्या कार्याला आदरांजली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी ११ कोटी ६९ लक्ष निधीतून साकारण्यात येत असलेल्या जळगाव भव्य अश्या कृषीभवनाचे भूमिपूजन करत तालुक्यातील ५०० प्रगतिशील शेतकऱ्यांचा सपत्नीक आदर्श शेतकरी म्हणून सन्मान केला.

यावेळी माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज. केळीतज्ञ – श्री. के. बी. पाटील (जैन इरिगेशन), जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, से. नि. कृषी संचालक- श्री. अनिल भोकरे, राज्य पुरस्कार प्राप्त कृषी भुषण अरुण निकम सर, बाळासाहेब राऊत (शिंदी), आर.के.पाटील (शिरसगाव), भगवान परदेशी (जामडी), सौ.सिमा धनंजय पाटील (पिंप्री प्रदे), आशिषकुमार पटेल (चाळीसगाव), नाना पाटील (दडपिंप्री), उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय चव्हाण, PWD चे बैसाणे, माजी पं.स. उपसभापती आनंदा अण्णा पाटील, मार्केट सभापती मच्छिंद्र राठोड, उपसभापती वत्सलाताई पाटील, माजी पंचायत समिती सभापती संजू तात्या पाटील, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा देवयानीताई ठाकरे, के.बी.दादा साळुंखे, पोपट तात्या भोळे, प्रा.सुनील निकम, धर्माआबा वाघ, आनंदजी खरात, संजु आबा पाटील, सरदारशेठ राजपूत, मार्केट संचालक रवी आबा पाटील, रवींद्र आबा पाटील, कपिलदादा पाटील, शैलेंद्र पाटील, नवलदादा पवार, प्रदीप पाटील, निलेश वाणी, विजयाताई पवार, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय पाटील, धनंजय आप्पा मांडोळे, सुरेश महाराज, पैलवान नथ्थु चौधरी, रयत सेना अध्यक्ष गणेश दादा पवार, मोहिनी ताई गायकवाड, सुलभाताई पवार, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील व सर्व तालुका टिम उपस्थित होते.

तत्पूर्वी शेतकऱ्यांची चाळीसगाव शहरातून बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सम्राट बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, स्व.रामराव जिभाऊ पाटील यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली.

भाजपा व भाजपा किसान मोर्चातर्फे आयोजित या कार्यक्रमात तालुक्याचे भाग्यविधाता म्हणून ओळख असलेले कर्तृत्ववान आमदार स्वर्गीय रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या पावलांवर पाऊल ठेवत छोटासा कार्यकर्ता म्हणून मार्गक्रमण करत शेतकरी हितासाठी एक भव्य असे कृषीभवन निर्माण करण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम करत त्यांना आदरांजली आमदार मंगेश चव्हाण यांनी वाहिली तसेच पारंपरिक शेती कडून तंत्रज्ञान युक्त शेतीकडे वळून, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातांना बळकटी मिळते, ती मागे सुखदुःखात सक्षमपणे उभे असलेल्या जोडीदाराची या जोडीदाराच्या साथीने प्रगतिशील शेतकरी ठरलेल्या ५०० शेतकऱ्यांचा सपत्नीक आदर्श शेतकरी म्हणून सन्मान करण्यात आला.

एकाच वर्षात चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ३०० कोटींची मदत

जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती, यात शासनाच्या वतीने केवळ चाळीसगाव तालुक्याचा दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी समावेश करण्यात चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले होते.

त्यानंतर पीकविमा व कापूस अनुदान माध्यमातून आतापर्यंत ३०० कोटींची मदत मागील खरीप हंगामात चाळीसगाव तालुक्याला मिळाली असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी मनोगतात दिली.
खरीप हंगाम २०२३ – १३३ कोटी (८३ हजार शेतकरी)खरीप हंगाम २०२३ पीकविमा – २५ टक्के आग्रीम – २५ कोटी (५७ शेतकरी)
खरीप हंगाम २०२३ उंबरठा उत्पन्न आधारित पीकविमा – ११२ कोटी (५७ हजार) कापूस अनुदान – ३० कोटी (७६ हजार शेतकरी)

कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तसेच भाजपा किसान मोर्चातर्फे केले होते. सोबतच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here