Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»बीसीसीआयला मागील वर्षात अब्जावधींची कमाई
    राष्ट्रीय

    बीसीसीआयला मागील वर्षात अब्जावधींची कमाई

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 9, 2023Updated:August 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    बीसीसीआयला मागील वर्षात अब्जावधींची कमाई-saimatlive.com
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 

    भारतीय क्रिकेट (Indian Cricket) नियामक मंडळ (BCCI) सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात बीसीसीआयने कोट्यवधी रुपयांचा आयकर सरकारकडे जमा केला यावरूनही याचा अंदाज लावता येतो. बीसीसीआयची या आर्थिक वर्षात एकूण कमाई ७६०६ कोटी रुपये होती. त्यानंतर बीसीसीआयने सरकारला एकूण ११५९ कोटी रुपये दिले, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३७% अधिक कर भरला आहे.

    भारत सरकारचे (Indian Government) अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ८ ऑगस्ट रोजी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना बीसीसीआय (BCCI) आयकर जमा करत असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी बीसीसीआयचे गेल्या ५ वर्षातील उत्पन्न आणि त्यानंतर जमा झालेल्या कराची संपूर्ण माहिती दिली आहे.

    २०२० मध्ये जेव्हा जगभरात कोरोना महामारीचा प्रभाव दिसत होता, तेव्हा त्याचा परिणाम बीसीसीआयच्या कमाईवरही दिसून आला होता. बायो-बबलमध्ये क्रिकेट सामने होत असल्याने खर्चात वाढ झाली होती आणि स्टेडियममध्ये चाहत्यांच्या येण्यावर बंदी असल्याने त्याचा परिणाम कमाईवरही दिसून आला होता.

    बीसीसीआय साठी आयसीसीच्या महसूल संचातून मिळणारे उत्पन्न हा फक्त एक स्रोत आहे. बीसीसीआयला इंडियन प्रीमियर लीग (IPL) आयोजनातून आणखी एक मोठी रक्कम मिळते, ज्यामुळे त्यांना खूप मोठी रक्कम मिळते. खेळाडूंचा सहभाग आणि प्रायोजकत्व या दोन्ही बाबतीत आयपीएल ही जगातील सर्वात किफायतशीर लीग राहिली आहे.

    बीसीसीआयने गेल्या ५ वर्षात कधी आणि किती भरला कर?

    बीसीसीआयने मागील ५ वर्षात दिलेल्या आयकर माहितीनुसार, जी सरकारने दिली होती, त्यानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५९६.६३ कोटी रुपये, २०१८-१९ मध्ये ८१५.०८ कोटी रुपये, २०१९-२० मध्ये, ८८२.२९ कोटी रुपये, २०२०-२१ मध्ये ८४४.९२ कोटी रुपये, तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात ११५९ कोटी रुपये बीसीसीआयने सरकारला आयकर म्हणून दिले आहेत. त्याचबरबर २०२०-२१ मध्ये बीसीसीआयचे उत्पन्न ४७३५ कोटी रुपये आणि खर्च ३०८० कोटी रुपये होता. या आर्थिक वर्षात बीसीसीआयची कमाई ७६०६ कोटी रुपयांवर पोहोचली असताना, खर्च ३०६४ कोटी रुपये होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.