धरणगावातील युवकांचा बारामती अभ्यास दौरा यशस्वी

0
25

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा गावातील युवकांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीचा अभ्यास दौरा नुकताच यशस्वीरित्या केला. शेती क्षेत्राची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामतीचे वैभव प्रत्यक्ष बघता यावे, या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.

धरणगाव शहर तसेच डॉ.हेडगेवार ग्रामपंचायत येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी तथा गावातील होतकरू युवकांनी सहभाग नोंदविला. नियोजित दौऱ्यात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या भेटींचा योग जुळून आला.

जिद्द उराशी बाळगून युवक परतले…!

बारामतीचे खरे वैभव असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राचा १०२ एकरचा भव्य परिसर बघत असतांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक अर्थाने परिचय झाला. अत्याधुनिक पद्धतीने होणारी शेती, ठिबक सिंचन प्रणाली, जैविक खतांचे व्यवस्थापन, शेळी पालन प्रकल्प, साठवण तलाव, मत्सपालन, आधुनिक रोपवाटिका आदी गोष्टी तसेच डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून पशुपालन करण्याची आदर्श पध्दत, दूध काढण्याचे आधुनिक तंत्रज्ञान, दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, बायोगॅस प्रकल्प आदी सर्व बाबींची व्यापक अर्थांने माहिती मिळाली. पवार साहेबांचे वडील बंधू आप्पासाहेब पवार यांच्यापासून सुरू झालेला वारसा पुढे नेण्याचे कार्य आजतागायत जोमाने सुरू आहे. शिक्षण तसेच औद्योगिक क्षेत्रातील बारामती शहराची प्रगती उल्लेखनीय आहे. अशा सर्व गोष्टींचा ‘याची देही याची डोळा’ असा अनुभव घेऊन तसेच नवीन उत्साह व काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून युवक धरणगावी परतले.

यांचा होता सहभाग

अभ्यास दौऱ्यात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोहन पाटील, डॉक्टर सेलचे अध्यक्ष नितीन पाटील, अमोल रेसिडेंसीचे संचालक अमोल हरपे, खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष नईम काझी, संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, मोहित पाटील, दिनेश भदाणे, वैभव बोरसे, विक्रम पाटील, प्रफुल्ल पवार, गौरव चव्हाण, सागर भामरे, सागर चव्हाण, चेतन पाटील, अमोल पाटील, निखिल पाटील, अजय बोरसे, सागर महाले, विलास नन्नवरे, हरीष विसावे, प्रथमेश पवार, शुभम शुक्ला यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here