Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon:नववर्षाच्या पहिल्याच मंगळवारी बाप्पाचे आशीर्वाद
    जळगाव

    Jalgaon:नववर्षाच्या पहिल्याच मंगळवारी बाप्पाचे आशीर्वाद

    saimatBy saimatJanuary 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: Bappa's blessings on the first Tuesday of the new year
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अंगारक संकष्ट चतुर्थीने जळगाव जिल्ह्यात भक्तीचा महोत्सव

    साईमत /जळगाव/प्रतिनिधी

    नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या मंगळवारी आलेल्या ‘अंगारक संकष्ट चतुर्थी’च्या दुर्मीळ योगामुळे मंगळवारी, ६ जानेवारी रोजी जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी आणि त्यातही अंगारकी योग जुळून आल्याने पहाटेपासूनच गणेश भक्तांनी मंदिरांकडे धाव घेतली. जिल्ह्यातील प्रमुख गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. सकाळपासूनच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

    पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा

    अंगारक संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याने अनेक भाविकांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उपवास, पूजा-अर्चा करून बाप्पाचे दर्शन घेणे पसंत केले. पहाटे ५ वाजेपासूनच शहर व ग्रामीण भागातील प्रमुख गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही भाविकांनी चंद्रदर्शनापर्यंत उपवास करून संकष्टीची परंपरा पाळली.

    इच्छापूर्ती गणेश मंदिरात भक्तीचा उत्साह

    जळगाव शहरातील श्रद्धास्थान असलेल्या इच्छापूर्ती गणेश मंदिरात अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरतीपासूनच अभिषेक, महापूजा व आरत्या सुरू झाल्या. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या मोठी असल्याने मंदिर प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले होते. रांगांमध्ये उभ्या असलेल्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, सावली व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. सुव्यवस्थित नियोजनामुळे दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

    तरसोदच्या नवसाला पावणाऱ्या बाप्पाला भाविकांची वारी

    जळगाव शहरापासून जवळच असलेल्या तरसोद येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री गणपती मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात जळगाव शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांनी पायी चालत येऊन दर्शन घेतले. अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्त मंदिरात अभिषेक, महापूजा, विशेष महाआरती तसेच प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांची ये-जा सुरू असल्याने तरसोद परिसर भक्तीमय झाला होता.

    अंगारक संकष्ट चतुर्थीचे धार्मिक महत्त्व

    हिंदू धर्मशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला ‘अंगारक संकष्ट चतुर्थी’ म्हटले जाते. हा योग अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी गणपतीची उपासना केल्यास संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. विशेष म्हणजे २०२६ या वर्षात जानेवारी व मे अशा दोन महिन्यांत अंगारकी संकष्ट चतुर्थीचा योग येणार असल्याने भाविकांमध्ये अधिक उत्साह दिसून आला.

    दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

    अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अनेक मंदिरांमध्ये दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर भाविकांनी उपवास सोडला. नवीन वर्ष सुख-समृद्धीचे, आरोग्यदायी व संकटमुक्त जावो, अशी प्रार्थना करत जळगावकरांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होणे पसंत केले.

    अंगारक संकष्ट चतुर्थीच्या या पवित्र पर्वाने जळगाव शहर व जिल्ह्यात श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असून नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने झाल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon / Nashirabad ; आमिषाला बळी पडून १३ वर्षीय मुलीचे अपहरण

    January 21, 2026

    Jalgaon : मध्यरात्रीच्या आगीत संसार जळून खाक

    January 21, 2026

    Raver : निलंबन टाळण्यासाठी ‘डील’; वनखात्यातील लाचखोरी उघड

    January 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.