डीजेवर बंदी आणून बँड वादकांना लोककलावंताचा दर्जा मिळावा

0
9

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

डीजेवर पूर्णपणे बंदी आणून बँड वादकांना लोककलावंताचा दर्जा मिळावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे प्रदेश सरचिटणीस निवृत्ती तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बँड वादकांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी अरुण हिवाळे होते. यावेळी बँड मालक महेंद्र वानखेडे, दामोदर सुरळकर, समाधान चंदनशिव, रवींद्र हिवाळे, दीपक पारेकर, बाबुराव तायडे, नाना बोरले, शेख रफीक, सलमान शा, सामाजिक कार्यकर्ते भास्कर आघाम, तुकाराम कसारे, कृष्णा सुरडकर, कृष्णा चंदनशिव, शाम जाधव, दिनेश चंदनशिव आदी बँड वादक उपस्थित होते.

डीजेमुळे बँड वादकाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यावर अवलंबून असलेला बँड मालक व सर्व बँड कारागीर यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते डीजेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली असल्याची चर्चा करण्यात येऊन डीजेवर पूर्णपणे बंदी आणावी, बँड वादकांना लोककलावंताचा दर्जा मिळावा, याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. यापुढे मागण्यांसाठी शासन दरबारी वेळोवेळी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे नियोजन बैठकीत केले. बैठकीला असंख्य बँड वादक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here