साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात बालमोहन, प्रताप चोपडा, शानबाग जळगाव, बुरहाणी पाचोरा विजेते ठरले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू मंजुषा भिडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष फारुख शेख, सचिव शिवछत्रपती प्राप्त पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, संघटनेचे इफ्तेखार शेख, भाऊसाहेब पाटील, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे, मार्गदर्शक राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच मंजुषा भिडे, राज्य पंच इफ्तेखार शेख, दर्शन आटोळे, धनंजय आटोळे, भावेश शिंदे, हर्षल भोसले, कु. कृपा बाविस्कर, यश जंजाळे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल असा
१७ वर्ष वयोगटातील मुलांच्या गटात शानबाग विद्यालय, जळगाव अंतिम विजेता तर इंदिराबाई ललवाणी, जामनेर उपविजेता ठरला. मुलींमध्ये बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा विजयी तर पी.आर.हायस्कूल धरणगाव उपविजयी ठरले. १९ वर्षाआतील मुलांच्या स्पर्धेत बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा अंतिम विजेता तर मु. मा. कनिष्ठ महाविद्यालय, पाचोरा उपविजेता ठरला. मुलींमध्ये प्रताप विद्या मंदिर, चोपडा विजेता तर इंदिरा गांधी विद्यालय, धरणगाव उपविजेता ठरला. स्पर्धेतील विजयी आणि उपविजयी संघांना पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे विभागीय पातळीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.