Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»बहुचर्चित 15 खाणपट्टाधारकांचे वाहतूक परवाने बंद
    नाशिक

    बहुचर्चित 15 खाणपट्टाधारकांचे वाहतूक परवाने बंद

    SaimatBy SaimatAugust 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, नाशिक : प्रतिनिधी
    तालुक्यातील सारुळ, राजुर, बहुला आणि पिंपळद येथील बहुचर्चित 15 खाणपट्टांधारकांचे महाखनिज प्रणालीत ऑनलाईन वाहतूक परवाने बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
    सारूळ, राजुर, बहुला व पिंपळद या परिसरातील गौण खजिन उत्खननाचा विषय चांगलाच गाजत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने 21 खडी क्रशरवर कारवाई करीत ते बंद केले होते. परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात उत्खनन झाल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला होता. खडीक्रशर चालकांनी नियमांचे पालन केले नसल्याने ही कारवाई झाल्याचे सांगितले गेले. या कारवाई विरोधात क्रशरचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अपर जिल्हाधिकारी यांना सुनावणी घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी सुनावणी घेत उपरोक्त निर्णय दिला. खाणपट्टेधारकांनी खाणपट्टा आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. खाण पट्ट्यात किती उत्खनन झाले, याची बहुतेकांनी दैनंदिन नोंद ठेवलेली नव्हती. खाणपट्टा परिसरात सीमांकन नव्हते. डोंगर-टेकडी फोडताना सहा मीटर नियम पाळला गेला नाही. खाणपट्ट्याचा करारनामा न करणे असे प्रकार उघड झाले. टेकड्यांचा चढ आणि उतार यावर गौण खनिजाचे उत्खनन करता येत नाही. अटी व शर्तीत ते नमूद असूनही त्या ठिकाणी उत्खनन झाले. ज्या ठिकाणी खाणपट्टा डोंगराळ भागात आहे, तिथे डोंगर रांगांचे उभे उत्खनन करता येत नाही. या नियमाची पायमल्ली झाली. या त्रुटींबाबत खाणपट्टाधारकांना नोटीस बजावत खुलासा सादर करण्याची संधी देण्यात आली होती. संबंधितांचा खुलासा केवळ नकारात्मक स्वरूपाचा असल्याने व आढळून आलेल्या त्रुटींबाबत कोणतीही समाधानकारक उत्तरे दिलेली नसल्याने अपर जिल्हाधिकारी पारधे यांनी आता 15 खाणपट्ट्यांच्या उत्खननावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण यांनी महाखनिज प्रणालीतील संबंधितांचे ऑनलाईन सुरू असलेले वाहतूक परवाने बंद करण्याचे आदेश दिले. यात शुभांगी बनकर, सिरील रॉड्रिक्स, हरिभाऊ फडोळ, श्रीराम स्टोन क्रशर, गणेश स्टोन मेटल, भगवती अर्थ मुव्हर्स, फ्रानिस सिरील रॉड्रिक्स, हेमंत लठ्ठा, अनिलकुमार कन्स्ट्रक्शन, अर्जुन नवले, मोतिराम नवले, निर्माण बिल्डमेट, गजानन नवले या खाणपट्टाधारकांचा समाव्ोश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Nashik:“खरात प्रकरण: मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम इशारा दोषींना कोणतीही सूट नाही”

    March 22, 2026

    Nashik Mhada Scam : म्हाडा भूखंड घोटाळा; मनवानी कोठडीत, बिल्डर लॉबी थरथरली

    March 20, 2026

    Premium Petrol Price Today Updates : जागतिक तेल किंमती वाढल्यामुळे भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ; साध्या पेट्रोल व डिझेलवर परिणाम नाही

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.