अडावद आरोग्य केंद्रातर्फे डेंग्यू प्रतिरोधाविषयी जनजागृती

0
74

विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दिले डेंग्यूविषयी धडे

साईमत/ न्यूज नेटवर्क/ अडावद, ता.चोपडा :

जिल्ह्याभरात १ जुलै ते ३१ जुलै हा डेंग्यू प्रतिरोध जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यासह अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये “डेंग्यू प्रतिरोध” विषयी जनजागृती करण्यात येत आहे.

अडावद येथील सार्वजनिक खासगी प्राथमिक शाळा तथा माध्यमिक विद्यालय अडावदमधील शालेय विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने किटकजन्य आजारात, डासांपासून होणारा प्रामुख्याने डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे डेंग्यू आजाराविषयी शंका निरसन करून डेंग्यू आजार होऊ नये, यासाठी कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येतात. त्यावर औषधोपचार करण्यासाठी तात्काळ शासकीय दवाखान्यात जाऊन रक्ताच्या तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात-लवकर उपचार करण्याबाबत अडावद आरोग्य केंद्राकडून सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात यांनी नोंदविला सहभाग

कार्यक्रमात प्र.आरोग्य सहाय्यक विजय देशमुख, यशवंत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल गवांडे, औषध निर्माण अधिकारी विजया गावित, आरोग्य सहायिका शोभा चौधरी, प्रयोग शाळा तंत्रज्ञ पायल गोसावी, आरोग्य सेवक संतोष भांडवलकर, आर.एस.पाटील, कैलास बडगुजर, गट प्रवर्तक संध्या बोरसे, धुडकु वारडे, सरगम ओस्तवाल, नारायण खजूरे, सचिन महाजन, सुनील महाजन, राहुल पाटील, दिलीप पाटील, आशा सेविका संध्या चव्हाण, प्रतिभा धोबी, शोभा गायकवाड, शारदा माळी, ज्योती साळुंखे, योगिता गायकवाड, हिराबाई माळी आदींनी सहभाग नोंदविला. तसेच तालुका हिवताप पर्यवेक्षक परेश जोशी, जगदीश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी सार्वजनिक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर साळुंखे, शिक्षक अरुण विसावे, श्रीमती अर्चना चौधरी, श्रीमती संगीता निकुंभ, सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कदम, आर.टी. मोरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी विजय देशमुख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here