साईमत, जळगाव : प्रतिनिधी
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयात १७ ते २३ सप्टेंबर दरम्यान नॅशनल फार्मेकोव्हिजिलन्स सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सप्ताहातून औषधींच्या प्रतिकूल परिणामांबाबात समाजात जनजागृती करण्यात आली.
सोमवारी, १८ सप्टेंबर रोजी नॅशनल फार्मेकोव्हिजिलन्स सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ.देवेंद्र चौधरी यांनी फार्मेकोव्हिजिलन्सबाबत संवाद साधला. तसेच २१ रोजी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरेपी कॉलेज व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आणि २२ सप्टेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी कॉलेज येथेही फार्मेकोव्हिजिलन्सबाबत प्रा.डॉ.बापुराव बिटे यांनी सेमिनार दिला. यानंतर २३ सप्टेंबर रोजी ई-पोस्टर स्पर्धा घेण्यात येऊन बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात द्वितीय वर्ष एमबीबीएसच्या गीतांजली कवाळे आणि सानिया शेख विजेत्या ठरल्या.
समाजात औषधाचे उचारात्मक गुणधर्म माहिती असतात. परंतु औषधांच्या अपायकारक दुष्परिणामबद्दल जागृती करण्याचे ध्येय सप्ताहात साधले गेले. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच डॉक्टरांनाही त्याचे महत्व विशद करण्यात आले. तसेच औषधांचे प्रतिकूल (दुष्परिणाम) नोंद करण्यासाठी डॉक्टर्स, नर्से, औषधविक्रेता, रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक यांना विशिष्ठ नमुना उपलब्ध करुन देण्यात आला. औषध प्रतिकूल (दुष्परिणाम) केंद्र हे औषधशास्त्र विभाग डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत आहे. सर्व संबंधितांनी प्रतिकूल परिणाम नोंद करण्याचे आवाहन डॉ.देवेंद्र चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.राहूल भावसार, डॉ.बापूराव बिटे, डॉ.नमिता यांनी परिश्रम घेतले.