साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव येथील प्रा. डॉ. मुकेश पाटील यांना प्राणीशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही पदवी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा ‘नाशिक विभागातील हिस्टोपॅथॉलॉजिकल आणि बायोकेमिकल बदलांच्या संदर्भात कॅप्रा हिकर्सच्या सेस्टोड परजीवींमध्ये जैव प्रणालीगत परिवर्तनशीलता’ हा विषय होता. त्यांना चाळीसगाव एन.वाय.एन.सी. कॉलेजचे प्रा. डॉ. ए.टी, कळसे यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल त्यांचे संस्थेचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन, अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.