रायसोनी महाविद्यालयात “टॉपर्स व पीअर टीचर” सन्मानित

0
26

साईमत जळगाव प्रतिनिधी

स्वायत्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील विविध अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय आलेल्या विध्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देवून सन्मानित करण्यात आले.

तसेच “पीअर टीचर” म्हणजेच हा प्रोग्राम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करण्यास मदत करते जसे महाविद्यालयात सध्याला शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात तसेच प्रॅक्टिकल ज्ञानात अधून मधून भर घालत मार्गदर्शन करणाऱ्या सिनिअर विध्यार्थ्यांना पीअर टीचर्स म्हणतात अशा विध्यार्थ्यांचा शोध घेत या कार्यक्रमात त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी आर.सी.पटेल फार्मसीचे प्राचार्य व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. संजय सुराणा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती, सिए दर्शन जैन उपस्थित होते, तर व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, परीक्षा नियंत्रक अविनाश पांडे, रजिस्टार अरुण पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी ३१ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देत सन्मानित करण्यात आले. तर पिअर टीचर्स म्हणून बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 4थे वर्ष दुर्गेश पाटील, बीटेक ई आणि टीसी अभियांत्रिकी तृतीय वर्ष सेजल पाटील, बीटेक सीएसई अभियांत्रिकी तृतीय वर्ष प्रज्ज्वल वाकुळकर, बीटेक एआय इंजिनिअरिंग 3रे वर्ष मोहित साळुंखे, बीटेक सिव्हिल अभियांत्रिकी तृतीय वर्ष शेख दानिश इम्रान, बी टेक डीएस अभियांत्रिकी तृतीय वर्ष प्रणय पाटील यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातून मागील वर्षी शिकून गेलेले गुणवंत पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here