साईमत, जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मंगलम् हॉल येथे जळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच उत्साहात झाला. त्यात खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रवीण वसंतराव पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधरी, उपजिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी, प्रतीक भोळे, जळगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, तालुका समन्वयक जितेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलन जिल्हा शिवसेना प्रमुख निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांच्यासह मान्यवरांनी केले.
यांनी केले कौतुक
प्रवीण पाटील यांच्या यशाबद्दल जैन उद्योग समुहाचे अशोक जैन, डॉ.सुदर्शन पाटील, डॉ.रितेश पाटील, नितीन विसपुते, विकास वाघ, प्रा.वासुदेव पाटील, ॲड. अविनाश भालेराव, प्रा.शिवराज मानके, अक्षय सोनवणे, मंगेश पाटील यांनी कौतुक केले आहे.