मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
साईमत।धानोरा, ता.चोपडा।प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील झि.तो.महाजन माध्यमिक व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्रा.मिलिंद बडगुजर यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय “समाजभूषण पुरस्काराने” गौरविण्यात आले. यानिमित्त शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यालयाचे शालेय समिती सदस्य योगेश पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
समर्थ फाऊंडेशन आणि एज्यूरिक हब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राज्यस्तरीय समाजभूषण ” पुरस्कार प्रदान सोहळा चौथा मजला, तृप्ती बॅक्वेट (ग्लोरिया हॉल), एम.एच. हायस्कूल, तलावपाळी जवळ, ठाणे पश्चिम येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डाॅ. दीपक साबळे आणि ॲड.सुनिता साबळे यांनी केले होते. कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वीस लोकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा न्यायालय बार असोसिएशनचेॲड. प्रशांत कदम उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी सी.बी.सोनवणे, व्ही.डी.कोष्टी, क्रीडा शिक्षक देविदास महाजन, प्रा.एस.सी. पाटील, प्रा.एस.बी.बडगुजर, ए.पी. शिरसाठ, दीपक पाटील, पूनम पाटील, रेखा महाजन, सौ.कल्याणी महाजन, योगिता बाविस्कर, एकता भामरे, आरती पाटील, ज्योत्स्ना महाजन, दिगंबर सोनवणे, दीपेश बडगुजर मच्छिंद्र महाजन यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.