साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील पेटंट प्राप्त संगणक विभागाच्या सहाय्यक प्रा.आरती पाटील, व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक आर. पी. जैस्वाल यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्यांना भारत सरकारतर्फे मिळालेल्या पेटंटबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
आरती पाटील आणि आर. पी. जैस्वाल यांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयातर्फे ‘लेक्सिकल ॲनालिसिस कंपाइलर डिव्हाइस’ यासंदर्भात डिझाईन निर्मिती केल्यामुळे पेटंट प्राप्त झाले आहेफ तसेच सहाय्यक प्राध्यापक आरती पाटील यांचे ‘डिजिटल वर्ल्ड’ या पुस्तकासाठी ‘सुधारित ब्लॉकचेन सुरक्षिततेची पद्धत’ अंतर्गत ‘Scopus indexed ISI THOMSON Reauters’ या ‘जर्नल ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम’ आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे डिझाईन व संशोधन प्रकाशित झाले आहे.
त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए. वाघ, रजिस्ट्रार डी.एम. पाटील, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.