Author: Vikas Patil

गोळीबाराच्या गुन्ह्यातील संशयितांची टोळी पकडली जळगाव( प्रतिनिधी) शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ झालेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात रामानंदनगर पोलिसांनी सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत. महेंद्र सपकाळे (वय २०, रा. पिंप्राळा) हा मित्र भूषण अहिरे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील मीनाताई ठाकरे मार्केट येथे आला होते. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याने आरोपींनी कोयते आणि गावठी कट्ट्यासह येऊन फिर्यादीवर गोळीबार केला. या गोळीबारात महेंद्र सपकाळे यांच्या कमरेखाली गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला होता. तपास करताना पोलिसांनी काही दिवसात सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल…

Read More

विदर्भात ३० , राज्यात अन्यत्र १५ जूनपर्यंत शाळांना सुटी पुणे (प्रतिनिधी)- येत्या शैक्षणिक वर्षात २०२५-२६ मध्ये विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील शाळा नेहमीप्रमाणे १६ जूनपासून सुरू होणार आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. संकलित मूल्यमापन चाचणीमुळे यंदा शाळा २५ एप्रिलपर्यंत सुरू होत्या. परीक्षांचा निकाल १ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये सुसंगती रहावी या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार उर्वरित राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू कराव्यात, त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू कराव्यात. विदर्भात ३० जून रोजी शाळा सुरू कराव्यात, त्या दिवशी…

Read More

क्रेनिओटॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅक्युट हिमॅटोमा इव्हॅक्युएशन शस्त्रक्रीया डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय, रूग्णालयात यशस्वी  जळगाव (प्रतिनिधी)- अपघातात गंभीर जखमी झाल्याने डोक्यात गंभीर रक्तस्त्राव व रक्ताची मोठी गाठ आढळून आलेल्या रूग्णावर क्रेनिओटॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅक्युट हिमॅटोमा इव्हॅक्युएशन शस्त्रक्रीया करून त्याचे प्राण वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालयाच्या मेंदू, मणका विकार तज्ज्ञांना यश आले. अपघातात मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवे येथील गणेश इंगळे या रुग्णाला वाहनाची जबर धडक बसली. यात रुग्णाच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्याच्या डोक्यात गंभीर रक्तस्त्राव झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णावर मेंदू व मणक्याचे विकार तज्ञ…

Read More

फालीतील विद्यार्थी कृषीक्षेत्राचे भविष्य – डॉ. बी. बी. पट्टनायक  जळगाव (प्रतिनिधी) – वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीनीचा वापर वाढत आहे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. हवामानातील बदलांसह अनेक संकंटे शेतीवर येत आहे. भविष्यातील शेती करण्याची पद्धत बदलावी लागेल आधुनिक तंत्रज्ञानासह कमी पाण्यात व हवामानातील बदल स्विकारेल अशी बियाणे, टिश्यूकल्चरची व्हायरस फ्री रोपांची निर्मिती ज्या ज्या पिकांमध्ये शक्य आहे त्यात केले पाहिजे. यासाठी अॅग्रीटेक इनोव्हेशन व बिझनेस प्लॅन फालीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले ते खऱ्या अर्थाने देशाचे भविष्य आहे प्रतिपादन स्टार अॅग्रीचे स्वतंत्र संचालक डॉ. बी. बी. पट्टनायक यांनी केले. शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर…

Read More

गुलाबराव देवकर, सतीश पाटील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर गलितगात्र झालेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्षाला पुन्हा धक्का बसणार आहे. शरद पवार यांचे निष्ठावान दोन माजी मंत्र्यांचा अजित पवार गटातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. गुलाबराव देवकर, सतीश पाटील यांच्याबरोबर आणखी काही माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारीही पुढील महिन्यात पक्षांतर करणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार गुलाबराव पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लगेचच अजित पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने पक्षश्रेष्ठी अनुकूल…

Read More

विम्याची रक्कम हडपण्यासाठी मेहुण्याकडून शालकाचा खून जळगाव (प्रतिनिधी) विम्याची रक्कम हडपण्यासाठी धुळे जिल्हयातील फागणे येथील शालकाची शेवगे (ता. पारोळा ) येथील मेहुण्याने एकाच्या मदतीने शालकाचा अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयाने ३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फागणे येथील समाधान पाटील याचा अपघाती मृत्यू झाल्याने १९ एप्रिलरोजी पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे, पोहेकॉ सुनील हटकर, संजय पाटील, अनिल राठोड, अभिजीत पाटील यांनी तपास केला. यात काहीतरी वेगळे असल्याचं जाणवले. मयताचा मेहुणा संदीप पाटील (वय ४०) तसेच चंद्रदीप…

Read More

बनावट कर पावत्या देऊन आरटीओला ठगवण्याचा प्रयत्न फसला ; गुन्हा दाखल जळगाव (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन कार्यालयात बनावट व्यवसाय कर पावत्या सादर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. एजंट आणि वाहन मालकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओ कार्यालयातील कर वसुली अधिकारी चंद्रशेखर शंकरराव इंगळे (वय ५६) यांनी फिर्याद दाखल केली आहे. इंगळे परवाना विभागात कार्यरत असताना २३ एप्रिलरोजी दुपारी सुलतान बेग मिर्झा (रा. उस्मानिया पार्क) हे शाकीब शेख (रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्या मालकीचे वाहन क्रमांक (एम एच १८- बी ए ०२२१) चा राष्ट्रीय परवाना रद्द करण्यासाठी अर्ज आणि कागदपत्रे घेऊन आले होते. या…

Read More

संशयास्पद जळालेल्या व्यक्तीचा मृत्यू अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील करणखेडा गावात २५ एप्रिलरोजी जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना २७ एप्रिलरोजी मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, मारवड पोलीस ठाण्यात २८ एप्रिलरोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश पाटील (वय ४५, रा. करणखेडा, सध्या मुक्काम सुरत) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश पाटील हे कुटुंबासह सुरत येथे वास्तव्यास होते. करणखेडा शिवारात त्यांची शेती असल्याने, ते २५ एप्रिल रोजी सुरतवरून शेती नांगरण्यासाठी गावी आले होते. २६ एप्रिलरोजी सकाळी ते जळालेल्या अवस्थेत आढळून आले. काही नागरिकांनी त्यांना अमळनेर येथील रुग्णालयात…

Read More

दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना ५० लाखांची मदत मुंबई (प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. या मदतीबरोबरच राज्य सरकारने आणखी घोषणा केल्या आहेत. पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेणार असून भविष्यातील रोजगारासाठीही विशेष योजना आखण्यात येणार आहे. या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्यात येणार आहे, असा निर्णयही मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. सरकारने केवळ आर्थिक मदतीपुरते सीमित न ठेवता, दीर्घकालीन पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून ही पावले उचलली आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या…

Read More

एटीएममधून १०० , २०० च्या नोटा मिळणार जळगाव (प्रतिनिधी ) भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना दिले आहेत. एटीएममधून आपल्याला ५०० रुपयांच्या नोटा मिळतात. परंतु आपल्याला सुट्टे पैसे हवे असतात. आता यावर रिझर्व्ह बँकेने तोडगा काढला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश बँका आणि एटीएम ऑपरेटर्संना दिले आहेत. आरबीआयने परिपत्रक जारी केले आहे आणि त्यात म्हटले आहे की नागरिकांना नोट उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे करणे गरजेचे आहे. एटीएममधून १००, २०० रुपयांच्या नोटा उपलब्ध व्हायला हव्यात. बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्संना सांगितले की, याची…

Read More