अजित पवार गटात गेलेले आधी भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते ; मंत्री गिरीश महाजन यांचा दावा जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार व काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. हे सर्वजण आधी आमच्या संपर्कात होते. भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक होते, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यांना प्रवेश दिल्याने आम्हालाही मार्ग मोकळा झाला, असा टोला त्यांनी अजित पवार यांना हाणला आहे. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एमआरआय यंत्रणेचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील ,मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी मंत्री महाजन यांनी अजित पवार गटात होत असलेल्या प्रवेशाविषयी भूमिका स्पष्ट केली. विधानसभेच्या निवडणुकीत…
Author: Vikas Patil
माजी आमदार दिलीप वाघ यांची पसंती भाजपच जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांसोबत तीन माजी आमदार राष्ट्रवादीमधून (शरद पवार) अजित पवार गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात दोन्ही माजी मंत्र्यांसह दोनच माजी आमदारांनी शनिवारी प्रवेश केला. पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांचेही नाव संभाव्य प्रवेश घेणाऱ्यात होते. मात्र, त्यांनी प्रवेश टाळल्याचे दिसून आले. त्यांच्या या संदिग्ध भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना, मी अजित पवार गटात जाणार असल्याची निव्वळ अफवा होती, असा दावा त्यांनी केला. शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वाघ राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने एकदा पाचोरा मतदारसंघाचे आमदार झाले होते. त्यानंतरही त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली, पण…
२३ ग्रॅम एमडी ड्रग्ससह भुसावळात तिघांना अटक जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातून अटक केलेल्या आरोपीच्या घरातून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई डीवायएसपी संदीप गावित व त्यांच्या टीमने केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. जळगाव शहरातील शाहूनगर मध्ये शहर पोलीस स्टेशनने टाकलेल्या धाडीमध्ये ड्रग्स जप्त करण्यात आले होते. मुख्य आरोपी सरफराज याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशी मध्ये याकुबचे नाव समोर आले. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आल्यानंतर जळगाव येथे आल्यावर त्याला अटक करून चौकशी केली असता भुसावळ येथील अन्सार भिती, वसीम खान यांची नावे समोर आली. वसीम खान यांच्या घराची…
मालवाहू रिक्षाची प्रवासी रिक्षाला धडक : १२ वर्षीय बालिका ठार जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी मालवाहू रिक्षा आणि प्रवासी रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली. ट्युशनला जात असलेली सावदा येथील डॉक्टरांची १२ वर्षाची मुलगी जागीच ठार झाली आहे. इतर २ विद्यार्थ्यांसह एक प्रवासी जखमी झाले. फैजपूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अदिती सोपान खडसे (वय १२, रा. सावदा) असे मयत बालिकेचे नाव आहे. सावदा येथील दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची ती कन्या आहे. अदितीच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ असा परिवार आहे. रविवारी प्रवासी रिक्षा (क्रमांक एमएच १९ सीडब्लू ३५९०) ही प्रवाशांना आणि ट्युशनला जाणाऱ्या डॉक्टरांच्या…
रिझर्व्ह बँकेची पाच बड्या बँकांवर ९७.२० लाख दंडाची कारवाई मुंबईः (प्रतिनिधी)- रिझर्व्ह बँकेने देशातील पाच मोठ्या बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा समावेश आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक ‘आयसीआयसीआय बँके’ला रिझर्व्ह बँकेने ९७.२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी, क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील सूचनांचे पालन न केल्याबद्दल ‘आयसीआयसीआय बँक’ेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. ॲक्सिस बँकेला रिझर्व्ह बँकेने २९.६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑफिस खात्यांच्या अनधिकृत कामाबाबत रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.…
शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार मुंबईः (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण योजनेला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यात केंद्राचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के हिस्सा असणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार १२२.४८ कोटी रुपये आणि राज्य सरकार ८१.६५ कोटी रुपये खर्च करणार आहे. ‘महाडीबीटी पोर्टल’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी, अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि महिला शेतकऱ्यांना टॅक्टरच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा १.२५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. सामान्य शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा १ लाख रुपये अनुदान मिळेल. अर्ज करण्यासाठी पात्र…
शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहा ; शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांना सल्ला जळगाव (प्रतिनिधी) – जमिन कमी असली तरी चालेल मात्र तिला व्यावसायिक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठेसह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. शेतीत सातत्य ठेवले पाहिजे, संघर्षाच्या काळातही तो करत राहिले पाहिजे, असा सल्ला शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ अकरावे अधिवेशनच्या तिसऱ्या टप्प्याची जैन हिल्सला सुरवात झाली. येथील शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील क्षेत्रभेटीनंतर फालीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चासत्रात बुरहानपूर जिल्ह्यातील फोफनार येथील सचिन महाजन, चंदन महाजन, संदिप पाटील (वढोदा ता. चोपडा), बापुसाहेब पाटील (तरळी ता. शिरपूर), अंकुश…
प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे विक्रेत्यांचे गुजरातसह मध्य प्रदेशात धागेदोरे जळगाव (प्रतिनिधी)- चोपडा तालुक्यात एप्रिल महिन्यात कृषी विभागाने १८ लाख रुपयांचे प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे जप्त केले होते. आता पुन्हा चोपड्यातच १२ लाख ७२ हजारांचे एचटीबीटी बियाणे जप्त करण्यात आले. विक्रेत्यांचे गुजरातसह मध्य प्रदेशात धागेदोरे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी साधारणपणे मे महिन्याच्या प्रारंभी पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीच्या लागवडीला सुरूवात करतात. यंदाही सर्वत्र कपाशी लागवडीची लगबग सुरू झाली असताना, गुजरातसह मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने जिल्ह्यात विक्रीसाठी आलेले प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे अनेक ठिकाणी उपलब्ध होत आहे. एचटीबीटी कपाशीच्या बियाण्याचा वापर केल्यामुळे तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे सहज शक्य होते. निंदणीसाठी…
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार मुंबई (प्रतिनिधी)- इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल सोमवार (५ मे रोजी) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे. कुठल्या वेबसाईटवर निकाल पाहू शकणार विद्यार्थी- http://hscresult.mkcl.org , http://hscresult.mkcl.org , STORIES YOU MAY LIKE , mahahssboard.in , Results.targetpublications.org , Results.navneet.com महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील. विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात त्याने संपादित…
वकील महिलेला ७५ लाखांत गंडवले , तिघांना अटक जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावात संगनमताने कट रचून भूमिरत्नम रियल इस्टेट प्रा. लि. नावाची शेल कंपनी तयार करून ६५ वर्षीय महिला वकिलाची ७५ लाखांत फसवणूक केल्याच्या शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात मनीष जैनसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तिघांना अटक करून कोर्टात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अॅड. शिरीन अमरेलीवाला (वय ६५, रा. शांतीबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार मनीष जैन (वय ४९, रा. यश प्लाझा), अतुल जैन (वय ५०), यशोमती जैन, जाफर खान (रा. सुप्रीम कॉलनी), विजय ललवाणी (रा. सिंधी कॉलनी), अक्षय अग्रवाल (रा. गोलाणी) व…