सुवर्णकार सेना, अहिर सुवर्णकार महिला मंडळाकडून महिलांचा सत्कार जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सुवर्णकार सेना, अहिर सुवर्णकार महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन विशेष सन्मान कार्यक्रमात शासकीय रुग्णालय येथे महीला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचारी यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी रुग्णालयातील महीलांच्या कार्याला त्रिवार सलाम असे मत व्यक्त केले. अहिर सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा रंजना वानखेडे यांनी सांगितले की महिलांचे संघटन खुप गरजेचे असून महिलांनी एका तरी महिला मंडळात सहभाग घेणे गरजेचे आहे. अहिर सुवर्णकार महीला मंडळ उपाध्यक्षा संगीता विसपुते, सचिव राजश्री पगार, कार्यकारी…
Author: Vikas Patil
एकल माता पालकांचा सत्कार जळगाव (प्रतिनिधी) – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात पालक-शिक्षक संघाच्या वतीने एकल माता पालकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्या डॉ. शिल्पा बेंडाळे (संचालिका, के.सी.ई. सोसायटी ), पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष निरंजन वाणी, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे आणि पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते. सौ. रत्नमाला शिंदे यांनी मानपत्राचे वाचन व कविता सादर करून स्त्रीशक्तीचा जागर घडवला, सौ. मनिषा जयकर यांनी ‘आई’चे महत्त्व दर्शवणारी हृदयस्पर्शी कविता सादर केली. यावेळी डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी आयुष्यात येणाऱ्या संकटांवर सकारात्मक विचारसरणीने मात करा. मुलांना आदर्श नागरिक बनवा. गृहिणी नव्हे तर गृहनिर्माते बना.…
मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यावर आंदोलनाचा प्रयत्न रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात मुंबई (प्रतिनिधी ) – महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यावर आक्रमक होत त्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. महिला दिनानिमित्त रोहिणी खडसे यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून थेट राष्ट्रपतींना स्वसंरक्षणासाठी खून करण्याची परवानगी महिलांना द्यावी अशी मागणी केली. या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली असतानाच त्यांनी महिलांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सह्याद्री गेस्ट हाऊस गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट नाकारल्यामुळे रोहिणी खडसे…
तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे १० मार्चला अमळनेरात आयोजन जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलन सोमवार १० मार्चरोजी अमळनेरच्या प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात होणार आहे. या संमेलनात १५० विद्यार्थी साहित्यिक सहभागी होतील. अमळनेर येथे विद्यापीठाचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र असून १० मार्चरोजी एक दिवसाचे हे विद्यार्थी साहित्य संमेलन होणार आहे. म्हसदी येथील स्व. आर. डी. देवरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष ॲङ. अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा. शिवाजी पाटील हजर राहणार आहेत. या…
कापूस विक्रीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पद्धतशीर पिळवणूक जळगाव ( प्रतिनिधी ) – खान्देशातील कापूस उत्पादक प्रतिकूल हवामान, कीड-रोगांचा विळखा आणि घसरलेल्या बाजारभावामुळे अडचणीत आले असताना खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून त्यांची पद्धतशीर पिळवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. कापूस मोजताना अप्रमाणित तराजू काटा आणि मापे वापरली जात असल्याने कापूस उत्पादकांचे नुकसान होत आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी खरिपात आठ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे पीक घेतात. यंदा भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस खरेदी सुरू असेपर्यंत खान्देशातील कापूस शक्यतो व्यापाऱ्यांना मिळाला नाही. महामंडळाची खरेदी थंडावल्यानंतर व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची संधी मिळाली. कापूस मोजण्यासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक वजन काट्याऐवजी साध्या तराजू काट्याचा वापर…
राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या प्रभावी प्रसिध्दीची गरज जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासंदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांच्या विकासावर भर देण्यासह पर्यावरणीय पर्यटनाला (इको टुरिझम) चालना देण्याबाबत चर्चा झाली. पर्यटनस्थळांचे आकर्षक पद्धतीने संवर्धन करतानाच, आधुनिक सुविधा, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजनावर भर देण्याविषयी चर्चा झाली. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी प्रसिध्दी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. पर्यटनक्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहनासाठी नवीन संधी शोधण्याचेही विचारमंथन करण्यात आले. यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिले. युनेस्कोच्या…
जलयुक्त शिवार-२ योजनेला सुरुवात, १६० सिंचन प्रकल्पांना फेरमान्यता मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील सिंचन प्रकल्पांना वेग देण्यासाठी १६० प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवार-२ योजनेला सुरुवात केली आहे. तसेच नदीजोड प्रकल्पांवरही विशेष भर दिला जात आहे, अशी माहिती नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना लाभ देणाऱ्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाचा पुढील टप्पा कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाच्या निविदा जाहीर झाल्या असून या प्रकल्पाचा एकूण खर्च ७ हजार १५ कोटी रुपये आहे त्याद्वारे ९.१९ टीएमसी पाणी गिरणा नदीत सोडण्यात येणार आहे. विरोधकांनी सोयाबीन खरेदीबाबत टीका केली असली, तरी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राने सर्वाधिक सोयाबीन खरेदी केल्याचा…
सिंधी कॉलनीत तरुणाची गळफासाने आत्महत्या जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलनीत तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ मार्चरोजी मध्यरात्री साडेबारा वाजता उघडकीस आली एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . विजय उर्फ सनी मनोज छाबडिया (वय २३, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो वडील आणि काका यांचेसह राहत होता. काही महिन्यांपासून तो घरीच होता. ७ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो घरीच होता. दरम्यान शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने विजय याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात…
‘ छावा’चा परिणाम ; बुरहाणपूरमध्ये औरंगजेबाचा खजिना शोधणाऱ्यांची झुंबड बुरहाणपूर (न्यूज नेटवर्क ) – असीरगड येथे अजब प्रकारात गावकरी डोक्याला टॉर्चचे हेल्मेट, मोबाइल टॉर्च सुरू करून रात्री अंधारात माती चाळत आहेत. शेतात सोन्याची नाणी आढळल्याची अफवा पसरल्यानंतर ही नाणी शोधण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनाच बुरहाणपूर हे औरंगजेबाचे प्रिय शहर असल्याचे कळले. या शहरात त्याचा खजिना लपवलेला असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले होते. चित्रपटातील हा प्रसंग आणि असीरगड येथे उठलेली अफवा यामुळे लोकांनी शेतात धाव घेत सोन्याची नाणी शोधण्याचा प्रयत्न केला. असीरगड येथे महामार्गाची उभारणी करण्यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात खोदकाम झाले आहे. काही दिवसांपूर्वी…
खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसे यांचे राष्ट्रपतींना पत्र ! जळगाव ( प्रतिनिधी ) – आज जागतिक महिला दिनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना धक्कादायक पत्र लिहिले आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या, अशी मागणीचे पत्र सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे. त्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे. देशात आणि…